Jump to content

मैनपुरी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मैनपुरी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील मैनपुरी ह्या नगरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ मैनपुरी जिल्ह्यात तर एक इटावा जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ मैनपुरीमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ भोनगांव मैनपुरी
२ किशनी
३ मैनपुरी
४ करहाल
५ जसवंतनगर इटावा

खासदार

[संपादन]
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांच्या पत्नी डिंपल यादव येथील विद्यमान खासदार आहेत.

१९९६ सालापासून मैनपुरी मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून सलग ११ वेळा सपाचे उमेदवार निवडून येत आहेत.

वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९८४ आठवी बलराम सिंह यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८९ नववी उदय प्रताप सिंह जनता दल
१९९१ दहावी जनता पक्ष
१९९६ अकरावी मुलायमसिंह यादव समाजवादी पक्ष
१९९८ बारावी बलराम सिंह यादव
१९९९ तेरावी
२००४ चौदावी मुलायमसिंह यादव
२००४ पोटनिवडणूक चौदावी धर्मेंद्र यादव
२००९ पंधरावी मुलायमसिंह यादव
२०१४ सोळावी
२०१४ पोटनिवडणूक सोळावी तेज प्रताप सिंह यादव
२०१९ सतरावी मुलायमसिंह यादव
२०२२ पोटनिवडणूक सतरावी डिंपल यादव
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]