शरद यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शरद यादव
शरद यादव


लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ माधेपुरा

जन्म १ जुलै, १९४७ (1947-07-01) (वय: ७१)
हुशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश
राजकीय पक्ष जनता दल (संयुक्त)
पत्नी डॉ. रेखा यादव

शरद यादव (जुलै १, इ.स. १९४७- हयात) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे विद्यमान पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते आहेत.

कारकीर्द[संपादन]

ते सर्वप्रथम इ.स. १९७४ मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून विजय मिळवला. इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बदाऊन लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर ते विश्वनाथ प्रताप सिंह सरकारमध्ये इ.स. १९८९ ते इ.स. १९९० दरम्यान वस्त्रोद्योगमंत्री होते. त्यानंतर इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते बिहार राज्यातील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमानवाहतूकमंत्री आणि कामगारमंत्री म्हणून काम बघितले.तसेच इ.स. १९९७ मध्ये ते जनता दलाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. इ.स. २००४ ते इ.स. २००९ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.

बाह्य दुवे[संपादन]