Jump to content

पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा
Pait Wah
मेघालय राज्यातील जिल्हा
पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा चे स्थान
पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय ख्लिरियात
क्षेत्रफळ
 - एकूण २,०४० चौरस किमी (७९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,२२,९३९ (२०११)
-लोकसंख्या घनता ५७ प्रति चौरस किमी (१५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ५८.३%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ शिलाँग
-खासदार व्हिन्सेंट एच. पाला
संकेतस्थळ


पूर्व जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे विभाजन करून पूर्व जैंतिया हिल्स व पश्चिम जैंतिया हिल्स हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले. पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेस आसाम राज्य तर नैऋत्येस बांगलादेशचा सिलहट विभाग आहेत. २०११ साली पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.२३ लाख इतकी होती. ख्लिरियात नावाचे नगर पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधून धावतो व मेघालयला आसामसोबत जोडतो.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सुमारे ७२ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]