Jump to content

खासी लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारंपारिक वेशभुषेतील खासी महिला

खासी हा प्रामुख्याने भारताच्या मेघालय राज्यामध्ये वास्तव्य करणारा एक वांशिक समूह आहे. त्याचबरोबर खासी लोक आसाम राज्यात व बांग्लादेश देशात देखील आढळतात. मेघालयच्या पूर्व भागात खासी लोकांचे प्राबल्य असून तो मेघालयमधील सर्वात मोठा वांशिक समूह आहे. भारताच्या संविधानामध्ये खासी लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे.

आजच्या घडीला भारत व बांग्लादेश मध्ये खासी लोकांची लोकसंख्या सुमारे १५ लाख इतकी आहे. ह्यामधील सुमारे ८५ टक्के खासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. खासी लोक प्रामुख्याने खासी भाषा वापरतात.

प्रसिद्ध खासी व्यक्ति

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत