Jump to content

पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा
Pait Wah
मेघालय राज्यातील जिल्हा
पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा चे स्थान
पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय जोवाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,६९३ चौरस किमी (६५४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,७०,३५२ (२०११)
-शहरी लोकसंख्या २८,४२०
-साक्षरता दर ६३.२%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ शिलाँग
-खासदार व्हिन्सेंट एच. पाला
संकेतस्थळ


पश्चिम जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे विभाजन करून पश्चिम जैंतिया हिल्स व पूर्व जैंतिया हिल्स हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले. पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस आसाम राज्य तर नैऋत्येस बांगलादेशचा सिलहट विभाग आहेत. २०११ साली पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २.७ लाख इतकी होती. जोवाई नावाचे नगर पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यामधून धावतो व मेघालयला आसामसोबत जोडतो.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सुमारे ६७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय आहेत. प्नारवार ह्या वांशिक जैंतिया लोकांच्या खासी भाषा येथील प्रमुख भाषा आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]