"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ५: | ओळ ५: | ||
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले. |
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले. |
||
==बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम== |
|||
* शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. [[सुहासिनी कोरटकर]] या [[बा.भ. बोरकर]] यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
२१:५७, १० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० - जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील कवी होते.
जीवन
बोरकरांचा जन्म गोव्यातल्या कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन ('तेथे कर माझे जुळती')यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.
बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम
- शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सुहासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.
प्रकाशित साहित्य
शीर्षक | प्रकाशन | प्रकाशन दिनांक (इ.स.) | भाषा | साहित्यप्रकार |
---|---|---|---|---|
प्रतिभा | इ.स. १९३० | मराठी | कवितासंग्रह | |
जीवनसंगीत | इ.स. १९३७ | मराठी | कवितासंग्रह | |
दूधसागर | इ.स. १९४७ | मराठी | कवितासंग्रह | |
आनंदभैरवी | इ.स. १९५० | मराठी | कवितासंग्रह | |
चित्रवीणा | इ.स. १९६० | मराठी | कवितासंग्रह | |
गितार | इ.स. १९६५ | मराठी | कवितासंग्रह | |
चैत्रपुनव | इ.स. १९७० | मराठी | कवितासंग्रह | |
कांचनसंध्या | इ.स. १९८१ | मराठी | कवितासंग्रह | |
अनुरागिणी | इ.स. १९८२ | मराठी | कवितासंग्रह | |
चिन्मयी | इ.स. १९८४ | मराठी | कवितासंग्रह | |
मेघदूत | मराठी | अनुवादित काव्य | ||
महात्मायन | मराठी | महाकाव्य (अपूर्ण) |
संकलित किंवा संपादित सहित्य
बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.
शीर्षक | प्रकाशन | प्रकाशन दिनांक (इ.स.) | संपादक | भाषा | साहित्यप्रकार |
---|---|---|---|---|---|
बोरकरांची कविता | मौज प्रकाशन | इ.स. १९६० | मंगेश पाडगावकर | मराठी | काव्यसंग्रह |
चांदणवेल | काँटिनेँटल प्रकाशन | इ.स. १९७२ | गो.म. कुलकर्णी | मराठी | काव्यसंग्रह |
बोरकरांची प्रेमकविता | सुरेश एजन्सी, पुणे | इ.स. १९८४ | रा.चिं. ढेरे | मराठी | काव्यसंग्रह |
कैवल्याचे झाड | सुरेश एजन्सी, पुणे | इ.स. १९८७ | मराठी | काव्यसंग्रह | |
बोरकरांची निवडक कविता | साहित्य अकादमी | इ.स. १९९६ | डॉ. प्रभा गणोरकर | मराठी | काव्यसंग्रह |
काव्येतर साहित्यसंपदा
- ललितलेख संग्रह ४
- कादंबऱ्या ४
- कथासंग्रह २
- चरित्रात्मक प्रबंध २
- अनुवाद ६
- संपादित कवितासंग्रह १ कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा
- कोंकणी साहित्यकृती १०
बाह्य दुवे
- http://www.marathimati.net/ba-bha-borkar/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - म.न.से. संकेत-स्थळावरील माहिती.