Jump to content

देवदत्त साबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवदत्त साबळे हे मराठी गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी संगीत दिलेली 'ही चाल तुरुतुरु' आणि 'मनाच्या धुंदीत लहरीत येना' ही गाणी कधीकाळी प्रसिद्ध झाली होती. साबळे हे शाहीर साबळे यांचे चिरंजीव असून मराठी अभिनेत्री चारुशीला साबळे ही त्यांची बहीण आहे. साबळे यांनी 'आक्रंदन' चित्रपटातील 'देव जेवला आमी पहिला' हे आदिवासी गाणे गायले आहे , ज्याचे दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी केले आहे.

त्यांचे वडील शाहीर साबळे यांनी तयार केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात साबळे यांनी सादरीकरण केले असून सुषमा देशपांडे लिखित ‘बाया दार उघड’ या कार्यक्रमाला संगीत दिले आहे.

पुरस्कार आणि

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]