कोमनादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


महाराष्ट्रातिल रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याच्या पुर्व विभागात सारडे गावात कोमनादेवी (Coordinates: १८°५०'०"उत्तर ७३°०'२७"पूर्व ) हि एक स्थान देवता असुन ती पाषाण रुपात पुजली जाते. हे देऊळ उरण शहरापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे. देवीची कोणतीही मुर्ती नसुन एक लहान पाषाण आहे. हे स्थान सारडे गावात असुन त्याच्या पुर्व दिशेला असलेल्या कोमनादेवी डोंगरावर वसलेले आहे. पिरकोन,पाले गावाच्या दक्षिणेला आहे. येथे पुर्वी दाट झाडी होती १९९० नंतर हळुहळु ती कमि झाली . सारडे गावात हि देवता पुजनीय असुन पिरकोन आणि पंचक्रोशित सुद्धा वंदनीय आहे. सध्या २०१५ मध्ये येथे विद्युतवाहिनीचे खांबांद्वारे येथे विज आली आहे. बहुतेक सर्व व्यवस्था सारडे गावकीकडे किंवा ग्रामपंचायतिकडे आहे. पावसाळ्यात आठवडा अखेरीस हे स्थान आणि टेकडी पर्यंटक आणि स्थानिक तरुणाईने बहरलेले असते, सुर्यास्ताच्यावेळी येथुन उरण मधिल द्रोणागिरी डोंगराच्या पलीकडे सोनेरी प्रकाशांत दक्षिण मुंबई दिसते ,तसेच पावसाळ्यामध्ये काळ्या मेघांमधुन हि मुंबईचे दर्शन होते,तर सांयकाळी विद्युतप्रकाशात चमचमणारे उरण परिसर दिसतो. पावसाळ्यात येथे तरुणाई आणि किशोरवयीन मुले फुटबॉल खेळण्यात व्यस्त असतात. विशेष असा रस्ता अजुन बनविला नाही आहे,अजुन पायवाटेनेच येथे पोहचता येते. येथे विविध पाषाणांनी हि देवता व्याप्त आहे.ह्या पाषाणांत देखिल देवतांचे अंश आहेत असे मानले जाते

गावातील 'जय मल्हार' या सामाजिक संस्थेद्वारे गावकर्यांच्या सहकार्याने स्टिलचे खांब आणि शेड चढवुन या स्थानाची शोभा वाढविली आहे.

घोलाच्या पश्चिमेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे जी पाषाण रुपात येथे निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टांत देऊन सांगितले मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजुन मंदिर बांधले गेले नाही,परंतु सारडे पिरकोन गावातिल भक्तांसाठी तिचे महत्व अपरंपार आहे.येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरुर घेतात.हि देवता येथे प्रचंड प्रिय असुन तिच्या रिक्षा चालक गणेश म्हात्रे या भक्तांनी स्वतःच्या वाहनांवर कोमनादेवी प्रसन्न हे तिच्या कृपेचे प्रतिक म्हणुन लिहिले आहे.

'सारडे विकास मंच'या सामाजिक संघटनेमधुन

नागेंद्र म्हात्रे,गोपाळ म्हात्रे आणि मंगेश पाटिल आणि

'एन बॉय्स' या लहान मुलांच्या ग्रुपने येथे स्वच्छता मोहिम राबऊन येथिल परीसर स्वच्छ केला आहे.

'गावातील स्वप्निल पाटिल आणि सुशांत माळी 'यांनी सारडे गावची श्री कोमनादेवी,श्री राधाकृष्ण आणि श्री हनुमान यांना समर्पित ध्वनिमुद्रिका 'नटखट कान्हा' ह्या गावातिल ग्रुप तर्फे बनविली आहे.स्थान :-


कोमनादेवी,समुद्र सपाटी पासून १०० मीटर  उंच