सटवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

सटवाई ही बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू लोकांत समज आहे.या देवीस सटवी, सटुआई, सटी,षष्टी देवता,रानसटवाई,छटी, घोडा सटवाई असेही म्हणतात. सर्वसाधारण पणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे सहावे दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे कि सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधीलिखित लिहिते.एक कोरा पांढरा कागद व टाक/पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. झोपेत हसणाऱ्या बाळास 'सटवाई हसविते' असाही एक समज आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे.

सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे.हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो

"सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]