Jump to content

मेसाई देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मैसम्मा, मेसाई
मैसम्मा, मेसाई देवी (महबूब नगर -तेलंगाणा जिल्ह्यातील मंदिर)

मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे.

मंदिरे

[संपादन]

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[]

  • मसाई पठार जिल्हा कोल्हापूर


महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत. मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव

संत साहित्यातील उल्लेख

[संपादन]

संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[] -

घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
-राजाई

संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[][] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो []


देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ।।
नैवेद्य वाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।।
बळेंची मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।।
बळेंची आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ।।
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ।।
एका जनार्दनी ऐसा देव । येथे कैसा अमुचा भाव ।।
~ संत एकनाथ गाथा २५८६; []
प्रेमे पूजी मेसाबाई सांडोनीया विठाबाई
काय देईल ती वोंगळा सदा खाय अमंगळा
आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी
तैसी नोहे विठाबाई सर्व दिनाची ती आई
न सांडिची विठाबाई एका जनार्दन पाही
~ संत एकनाथ गाथा २५८७; []
सांडोनीया विठाबाई कां रे पूजीता मेसाई
विठाबाई माझी माता चरणीं लागो इचे आता
...
~ संत एकनाथ गाथा २५८८.[]


तिजेस पूजी अनामिकांचे देव । काळकाई विणाईसी धरी भाव । म्‍हणे वो मेसाई मले पाव । तुले शूरण आलों कीं ॥१७॥
~ संत शेख महंमद []

गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-22 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2017-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-20 रोजी पाहिले.
  3. ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1765-2012-10-25-13-53-56
  4. ^ http://www.transliteral.org/pages/z70611145246/view
  5. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3229916.cms[permanent dead link]
  6. ^ http://www.transliteral.org/pages/z110506051627/view
  7. ^ a b c संत एकनाथ गाथा वेषधाऱ्याच्या भावना क्रमांक २५८६,२५८७ आणि २५८८ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z100222113342/view संस्थळावर जसे प्राप्त झाले
  8. ^ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z150503062750/view[permanent dead link] संस्थळावर जसे प्राप्त झाले