राग जयजयवंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जयजयवंती या पानावरून पुनर्निर्देशित)
जयजयवंती
थाट खमाज
प्रकार हिंदुस्तानी
जाती षाडव संपूर्ण
स्वर
आरोह सा रे ग' रे सा रे ग म प नि सां
अवरोह सां नि' ध प ध म ग रे ग' रे सा
वादी स्वर रे
संवादी स्वर
पकड
गायन समय पूर्वरात्र
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण गुरू सुरस गोकुळी राधिका मिरवली
नाटक - स्वयंवर
गायक पं राम मराठे
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत स्वरानंतर आलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरावर टिंब दिले आहे )


राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो.[१] जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो. हा राग बिलावल आणि सोरथ या दोन रागांचे मिश्रण आहे असे ही म्हणतात.

वेळ[संपादन]

राग जयजयवंती रात्रीच्या पहिल्या प्रहार दरम्यान सायंकाळ सहा ते नऊ वाजेपर्यंत गायले जातो.

आरोह[संपादन]

रे गा (कोमल) रे सा, रे गा (शुद्ध), म प धा प, नि सा.

अवरोह[संपादन]

सा नि (कोमल) धा पा, धा म गा रे, रे गा (कोमल) रे सा.

पकड[संपादन]

रे ग कोमल रे सा (मंद्र सप्तक) नि (शुद्ध) सा धा नी रे

कर्नाटक संगीत[संपादन]

कर्नाटक परंपरेत आणि यक्षगान नाट्यपरंपरेत याला द्विजवंती म्हणूनही ओळखले जाते .

जयजयवंती रागातील काही गीते[संपादन]

  • अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - आशा भोसले)
  • जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है (चित्रपट - सन ऑफ इंडिया, संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी)
  • बैरन हो गई रैना (चित्रपट - देख कबीरा रोया, संगीतकार मदनमोहन, गायक मन्ना डे)
  • मनमोहना बडे झूटे (चित्रपट - सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, गायिका लता मंगेशकर)
  • यह दिल की लगी कम क्या होगी (चित्रपट - मुगले आझाम, संगीतकार नौशाद, गायिका लता मंगेशकर)
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )
  • मल्याळम - ओरुनेराम एन्किलुम गायक: येसुदास, चित्रा)
  • तमिळ - यायुम न्यायुम यारकियारो


तमिळ[संपादन]

गाणे चित्रपट संगितकार गायक
"Enathullamae" Meera S. V. Venkatraman M. S. Subbulakshmi
"Amutha Tamizhil" Madhuraiyai Meetta Sundharapandiyan M. S. Viswanathan P. Jayachandran, Vani Jairam
"Anbae Sughama (Sahana Traces)" Paarthale Paravasam A. R. Rahman Srinivas, Sadhana Sargam
"Mannapenin Sathiyam" Kochadaiiyaan Haricharan, Latha Rajinikanth
"Mazhai Mega Vanna" (Charanam only) Desam K. S. Chitra, Srinivas
"Mouname Paarvayai" Anbe Sivam Vidyasagar S. P. Balasubrahmanyam,Chandrayee
"Poi Solla Kudathu" Run Hariharan
"Mukundha Mukundha"(Ragam Kapi toches also) Dasavathaaram Himesh Reshammiya Sadhana Sargamam

संदर्भ[संपादन]

  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. 2013. p. 127. ISBN 81-7434-332-6.