Jump to content

काळू नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


काळू ही महाराष्ट्रातील ठाणे व पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम ठाणे , पुणे व नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई- हरिश्चंद वन्यजीव अभयारण्यात पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे हरिश्चंद्र शिखराच्या दक्षिण उतरा दरम्यान टोलार खिंडीमध्ये होतो. ह्या नदीने प्रवरा नदीची उपनदी असणाऱ्या व मध्य अहमदनगर जिल्ह्याची भाग्यरेखा असणाऱ्या मुळा नदीच्या []शीर्ष प्रवाहांचे अपहरण केलं आहे, असे अनेक तज्ञांचे दृढ मत आहे, त्यामुळे सह्याद्रीत घाट-माथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसाचे पाणी दुष्काळ ग्रस्त अहमदनगर जिल्ह्याला व मराठवाड्याला न मिळता खाली कोकणात वाहून जाते. कोकणात भरपूर, मुबलक पाणी असून. देखील, हे सर्व पाणी समुद्रातच वाहून जाते. काळू नदीच्या दोन प्रमुख उपनद्या आहेत. भातसा व डोईफोडी ,पैकी सरळगाव संगम येथे डोईफोडी काळूस येऊन मिळते तर टिटवाळा आणि आंबिवलीच्या दरम्यान भातसा नदी येऊन मिळते ,येथूनच पूढे चार-पाच किलोमीटर अंतरावर अटाळी या गावी काळू व भातसेचा संयुक्त प्रवाह उल्हास नदीस मिळतो . पुढे उल्हासनदी कल्याण ,ठाणे मार्गे अरबी समुद्रात वसइच्या खाडीत जाऊन मिळते .नदीवरील सावर्ने -माळशेजघाट येथिल काळू वॉटर फॉल धबधबा प्रचंड प्रसिद्ध आहे.

  1. ^ Avi, T. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)