विठ्ठल मंदिर, पंढरपूर
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा ' लहान माडू ' ( देऊळ) उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषत: बाराव्या शतकात सापडलेल्या ' ८४ वा लेख ' हा शीलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर ८४ वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात. यामुळे हा शीलालेख झिजल्याने त्यास आता तारेचं कुंपण बसवलं आहे.
गाभारा , अंतराळ आणि सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या १६ खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरूडस्तंभ म्हणून प्रसिद्ध आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीणोर्द्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे १६ , १७ आणि १८ व्या शतकातलं बांधकाम असावं , असा जाणकारांचा अंदाज आहे. असं असलं तरीही मूळ मंदिराचे १२ व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा , व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळंही आहेत.
१९४६ मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |