Jump to content

संजीवन समाधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे. ही प्राचीन प्रथा आहे ज्यात स्वेच्छेने खोल ध्यानाच्याअवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो.[]

जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या भिन्न संकल्पना आहेत.

आळंदी येथे ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती.

संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते. संत ज्ञानेश्वर हे संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहेत.[]

संकल्पना

[संपादन]

अद्वैत वेदांतानुसार, संजीवन समाधीमध्ये योगी त्याच्या केवळ चित्ताचाच पंचमहाभूतात विलय करीत नाही, तर त्याच्याबरोबर तो जीवनाचा म्हणजे प्राणाचा पंचमहाभूतांमध्ये विलय करतो.

समाधीस्थितीत चित्तवृत्तीचा केवळ निरोध होत नाही, तर शेवटी चित्ताचा पंचमहाभूतात विलय होतो.

संजीवन समाधी ठिकाणे

[संपादन]
  1. आळंदी
  2. बाणगंगा तलाव
  3. माहीम

संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी

[संपादन]

ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली होती.[] संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल सांगितले आहे.[]

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे, ज्ञानेश्वर, तेव्हा एकवीस वर्षांचे असताना, त्यांनी संजीवन समाधीत प्रवेश केला.[][] त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे.[] त्यांच्या निधनानंतर नामदेव व इतर उपस्थितांनी शोक व्यक्त केला.

परंपरेनुसार असे मानले जाते की, नामदेवांनी विठोबाकडे ज्ञानेश्वरांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली. त्यानुसार नामदेवांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वरांना पुन्हा जिवंत करण्यात आले. डॅलमायर लिहितात की, "हे खऱ्या मैत्रीचे अमरत्व तसेच, उदात्त आणि प्रेमळ ह्रदयांच्या सहवासाची साक्ष देते."[]

अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वर अजूनही जिवंत आहेत.[][][१०][११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sharma, Arvind (1979), Thresholds in Hindu-Buddhist Studies, T.K. Mukherjee, ISBN 9780836404951
  2. ^ a b Dallmayr 2007, pp. 46–7.
  3. ^ "Yoga Teacher training India|TTC|Yoga Instructor Courses|Yoga Ashram India|Indian Yoga Classes". www.yogapoint.com. 2022-01-13 रोजी पाहिले.
  4. ^ Ranade, Ramchandra Dattatraya (1933), Mysticism in India: The Poet-Saints of Maharashtra, SUNY Press, ISBN 978-0-87395-669-7
  5. ^ Ranade 1933, p. 34.
  6. ^ Ranade 1933, p. 35.
  7. ^ Dallmayr 2007, pp. 46–7.
  8. ^ Novetzke, Christian Lee (2009), Shared Idioms, Sacred Symbols, and the Articulation of Identities in South Asia, Routledge, ISBN 978-1-135-90477-7
  9. ^ Novetzke 2009, p. 218.
  10. ^ Glushkova 2014, p. 116.
  11. ^ Glushkova, Irina (2014), Objects of Worship in South Asian Religions: Forms, Practices and Meanings, Routledge, ISBN 978-1-317-67595-2