भीमा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रभागा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
भीमा
उगम भीमाशंकर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र, कर्नाटक
लांबी ८६० किमी (५३० मैल)
उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ
धरणे उजनी धरण

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोडसीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम पुणे जिल्ह्यातील वाळकी(रांजणगाव बेट) येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस लहान मोठी धरणे आहेत.

चंद्रभागा[संपादन]

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पळूज, बठाण गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातील शेतकरी शेती करता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी अंबाबाईचे मंदिर चंद्रभागेच्या तटावर आहे.

भीमा नदीच्या उपनद्या[संपादन]

भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), मुळा, कुंडली, माण, नीरा वगैरे.

भीमा नदीकाठची मंदिरे[संपादन]

  • सोरबाबा मंदीर तरटगांव भोसे ,

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे मंदिर

  • सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर
  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर
  • कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर. हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
  • श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, घटर्गी, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, जिवरगी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • श्री क्षेत्र हेरूर, (हुलकांतेश्वर मंदिर)
  • श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिर आहे हे मंदिर जुन्या काळातील आहे.
  • श्री क्षेत्र सन्नती येथे श्री चंद्रलापरमेश्वरी देवी मंदिर हे अती प्राचीन मंदिर भीमा नदीच्या तीरावर आहे. गुलबर्गा जिल्हा.

भीमा नदीकाठची गावे[संपादन]

तरटगांव (भोसे),दौंड, कोरेगांव भीमा , निमगाव-दावडी,शेलपिंपळगाव , कोंढार चिंचोली , पंढरपूर, राजगुरुनगर, अरळी,

सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख[संपादन]

तुषार यमगर 7498504120