सतलज नदी
Jump to navigation
Jump to search
सतलज नदी पंजाबमधून वाहणाऱ्या पाच नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी आहे.
सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. येथे तिला लांग्केन झांग्बो (हत्ती नदी) अशा नावाने ओळखले जाते. पश्चिम-उत्तर पश्चिमेस २६० किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्कीला येथे भारतात शिरते. हिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो. यात दिशेत १५ किमी वाहून सतलज पाकिस्तानात शिरते. पुढे ही नदी चिनाब नदीला मिळते. येथे ही नदी पंजनाद नदी या नावाने ओळखली जाते. येथून १०० किमी पश्चिमेस बहावलपूर शहराजवळ ही नदी सिंधु नदीस मिळते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सतलज -1450 किमी :उगम मानस सरोवराजवळ राक्षस सरवरात .सतलजचे मूळ नाव शताद्री,शतद्रु .सतलज नदी शिप्कीला खिडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते .
हिमाचल प्रदेश व पंजाब मधून वाहत पाकिस्तानत सिधूला मिळते. सतलजची भारतातील लांबी 1050 किमी आहे.