Jump to content

चर्चा:भीमा नदी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80 हा संदर्भ पाहिला तर असे जाणवते की चंद्रभागा होणती आहे. भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात परंतु लिखित स्वरूपात तसा उल्लेख भुगोलात त्या नदीला चंद्रभागा नावाने आढळत नाही असे मला वाटते. सचिन १७:३५, १६ ऑगस्ट २०११ (UTC)


वस्तुत: पंढपुरात उल्लेखली जाणारी चंद्रभागा नदी भीमा नदीच असल्याची पूर्ण खात्री झालेली आहे.पंढरपूरच्या आधी आणि नंतर तीला भीमा नदी असेच म्हणतात.सुस्पष्ट लेखी उल्लेखांचा अभाव आश्चर्यकारक असाच म्हणला पाहीजे.इतर माहितीक्षेत्रांनी संभ्रमावस्था जपली तरी ज्ञानकोशाने तसे करणे हितावह नव्हे. ज्ञानकोशाची जबाबदारी माहिती वस्तुनिष्ठपणे देण्याची असते. आणि म्हणून या लेखातील मजकुराचे भीमा नदी लेखात विलनीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०५, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

या लेखास भीमा नदी लेखात विलीन करण्यास माझा पाठींबा आहे. - प्रबोध (चर्चा) २१:२३, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]
हा लेख भीमा नदी लेखात विलीन केल्यास तेथे चंद्रभागा असा विभाग करून तेथे येथील माहिती घालावी तसेच चंद्रभागा नावातील धार्मिक व सामाजिक महत्वही विशद करावे.
अभय नातू (चर्चा) ००:१०, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

असंमत

[संपादन]

नदीला एकाहून अधिक नावे असू शकतात. त्याशिवाय नदीला तिच्या मार्गातील एका विशिष्ट बिंदूपर्यंत एक नाव आणि नंतर दुसरे नाव असू शकते. त्याचप्रमाणे नदीच्या मधल्या एखाद्या तुकड्याचे नाव वेगळे असायला हरकत नसावी. पंढरपुरात भीमा नदी कोठे आहे असे विचारले तर अनेकांना सांगता येणार नाही. त्यामुळे भीमेच्या ज्या भागाला चंद्रभागा म्हणतात त्या भागाला चंद्रभागाच म्हणावे.

ब्रह्मपुत्रेच्या तिबेटमधील हिश्श्याला वेगळे नाव आणि भारतामधील प्रवाहाला वेगळे नाव आहे. वैनगंगा वर्धेला मिळते आणि प्राणहिता बनून आंध्र प्रदेशात जाते. तशीच भीमा पंढरपूरला आल्यावर चंद्रभागा बनते.....J (चर्चा) ०१:२३, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

हे अगदी बरोबर आहे.
चंद्रभागेबद्दलची सगळी माहिती भीमा नदीच्या लेखात येईलच. त्यासाठी चंद्रभागा नदीचे वेगळे पान नसले तरी चालेल. परंतु गुगल सर्च साठी हे शिर्षक तसेच ठेवून त्याला भीमा नदी मधील चंद्रभागा या sub-topic कडे permanent redirect लावू शकतो. - प्रबोध (चर्चा) ०२:५०, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]


१) अ आणि ब या दोन्ही नावांनी ओळखली जाणारी गोष्ट एकच असेल तर सहसा लेख एकच असावयास हवा. एका विषयावरील लेखन,सहसा, एकाच लेखात एकत्रपणे करणे ही विकिपीडियाची परंपरा आहे.
२) एकच माहिती अ लेखात भरावी का ब लेखात भरावी याचा संपादकांनाही संभ्रम होतो एकही लेख नीट तयार न झाल्यास लेखांना आणि ज्ञानकोशास विस्कळीतपणाचे रूप येण्याची शक्यता संभवते.
३) त्याही पेक्षा महत्वाचे वाचकास पूर्ण माहिती न मिळण्याचा धोका संभवतो. हिंदी महासागरातील त्सुनामी नंतर वाचकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळावी म्हणून इंग्रजी विकिपीडियावर लेखन वाढले.हे इथे नमुद करण्याचे कारण चंद्रभागेत पिण्याचे पाणी न उरल्यास भीमा नदीवरील धरणांचे दरवाजे उघडावे लागतात ही माहिती मला ज्ञानकोशातून समजावयास हवी किंवा (न होवो पण) भीमेवरील एखादे धरण पाण्याने भरून पाणि सोडले गेले तर पंढरपूरात पूरही येऊ शकतो, ही माहिती लेख विस्कळीत राहील्यास वाचक म्हणून मला मिळण्यास व्यत्यय येतो.
४) अ आणि सोबत कंसात ब जसे "अ (ब) " असे नाव देण्यासही माझी हरकत नाही. एकुण लेख शक्यतो एकत्र आणि वस्तुनिष्ठता जपणारा ठरावा हिच अपेक्षा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०३, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

अमेझॉन, नाईल वगैरे

[संपादन]

अमेझॉन नदीच्या हिश्श्यांना वेगवेगळी तीन-चार स्थानिक नावे आहेत. उदा० निग्रो नदीला मिळण्यापूर्वीचे तिचे नाव सॉलिमॉएस असे आहे. पेरूमध्ये ती नदी वेगळ्या नावाने ओळखली जाते. नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवराच्या आधी ’कागेरा’ असते.

तशीच भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा असते. इंग्रजी विकीवर सॉलिमॉएस आणि कागेरा या दोन्ही नद्यांच्या नावांची पाने आहेत. सॉलेमॉएसला पूर आला की अमेझॉनला येतो, कागेराला आला की......J (चर्चा) १२:१४, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

आपण प्रत्यक्ष नदीच नाव बदलत नाही आहोत केवळ शीर्षकाचे आणि लेखाचे वस्तुनिष्ठपणे एकत्रिकरण करतो आहोत. या सर्व बाबी विचारात घेऊन नंतरच प्रस्ताव मांडला आहे.अ आणि ब ह्या गोष्टी निव्वळ एक आणि एकच असताना अ नावाचाचा लेख वेगळा आणि ब नावाचा लेख वेगळा ही आदर्श स्थिती नव्हे. इंग्रजी विकिपीडियाती स्थिती ज्या बाबतीत आदर्श नाही, त्यातील एक स्थिती एवढेच म्हणेन (त्याबद्दल इंग्रजी विकिपीडियावर वेगळे प्रस्ताव मांडून बदल घडवावयास हवेत).

भीमा नदी (चंद्रभागा) , वर्धा नदी (प्राणहिता) अशा प्रकारची शीर्षके बनवता येतात ती अधिक सयूक्तीक ठरतात. मुख्य म्हणजे ज्ञानकोशाच्या वस्तुनिष्ठता संस्कृतीचे संवर्धन होते.वस्तुनिष्ठता संस्कृतीचा एका ठिकाणी आग्रह धरला की दुसरीकडेही आपोआप आग्रह धरला जातो. ज्ञानकोशाची रचना भावनेपेक्षा तर्कनिष्ठेवर अवलंबून असावयास हवी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३३, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)

चंद्रभागा, प्राणहिता वगैरे

[संपादन]

चंद्रभागा नदी ही भीमाच आहे, पण प्राणहिता ही वर्धा नाही. जेव्हा मोठ्या नदीला छोटी नदी मिळते, तेव्हा पुढील नदीच्या प्रवाहाला मोठ्या नदीचे नाव मिळते, पण जेव्हा दोन तुल्यबळ नद्या एकमेकींना मिळतात, तेव्हा संगमानंतरच्या प्रवाहाला एकाच नदीचे नाव ठेऊन चालत नाही. मुळा-मुठा संगमानंतरची नदी मुळा किंवा मुठा नसून मुळामुठा असते. तसेच वर्धा+वैतरणा ही प्राणहिता असते......J (चर्चा) १२:३०, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

जिथे एक उपनदी म्हणजे छोटी नदी आणि दुसरी मुख्य मोठी नदी आहे तिथे काही फारसा प्रश्न नाही ते लेख स्वतंत्रच असतील. जिथे आपण म्हणता तसे दोन तुल्यबळ नद्या संगम होऊन पुढे जातात तिथे संगमापर्यंत ज्या नदीची लांबी कमी भरते तीचा (उपनदी प्रमाणेच) लेख स्वतंत्र असू द्यावा. जास्त लांबीच्या नदीचे नाव + संगमा नंतरचे नाव असे एकत्र शीर्षक नामांकन करणे सहज शक्य असेल असे वाटते. (नि:संदिग्धीकरणाकरता गल्लत साचा गरजे प्रमाणे वापरता येतोच.)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५७, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

मिसिसिपी-मिसूरी

[संपादन]

'जिची संगमापूर्वीची लांबी अधिक तिचे नाव संगमानंतरच्या नदीला' हा नियम जगात पाळला जात नाही. संगमापूर्वीची मसूरी, संगमापूर्वीच्या मिसिसिपीच्या दुप्पट लांबीची आहे, तरी संगमानंतर त्या नदीला मिसिसिपी म्हटले जाते. Compared with the Mississippi River above their confluence, the Missouri is twice as long and drains an area three times as large. The Missouri accounts for 45 percent of the annual flow of the Mississippi past St. Louis, and as much as 70 percent in certain droughts.....J (चर्चा) १६:५४, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

धन्यवाद अगदी छान उदाहरण दिले
या केस मध्ये वस्तुत: मिसिसीपी उपनदी असूनही मिसूरी उपनदी असल्याचा संभ्रम होतो किंवा कसे म्हणजे आम्ही ज्ञानकोशातून वस्तुनिष्ठ माहिती देणे इतरांप्रमाणेच टाळतो. संगमा पर्यंतचा मिसिसीपी नदीचा उपनदी या नात्याने स्वतंत्र लेख आणि मिसूरी (मिसिसिपी) हे पूर्ण मिसूरी नदी लेखाचे शीर्षक नाव अधिक न्याय्य ठरेल किंवा कसे .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:५७, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

फक्त वरील मुद्द्याच्या संदर्भात --

लग्नानंतर नाव बदलणाऱ्या स्त्रीयांची दोन पाने असावीत का? घटस्फोटित स्त्रीयांची तीन पाने असावीत का? एलिझाबेथ टेलरची (माहेरचे १, ७ लग्ने, दोन लग्नांच्यामधील कालखंड, शेवटचे) १४ पाने असावीत का? जरी वेगळे वाटत असले तरी दोन्हींमध्ये साधर्म्य आहे. ही चर्चा लग्नानंतर नाव बदलणाऱ्या पुरुषांसही लागू होते.

नदी (किंवा स्त्री/पुरुषाचे) एकच पान असून त्यात वेगवेगळ्या नावा/उल्लेखांबद्दल विभाग करावे.

अभय नातू (चर्चा) ००:१३, १ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

एकाच व्यक्ती(गोष्टी)चे दोन लेखाचे उदाहरण सध्या गाहा सत्तसईचा संपादक हाल सातवाहन याच व्यक्ती बद्दल मराठी विकिपीडियावरच हल नावाने अजून एक लेख आहे.गाहा सत्तसई लेखाच्या पाठोपाठ हाल सातवाहना बद्दलही अधिक लिहावयाचे होते, पण दोन लेख वेगवेगळे विस्कळीत दिसलेकी संपादक म्हणून लिहिणेच नीटसे सूचत नाही इकडे हे आहे तिकडे ते आहे असे काहीसे वाटत राहाते.लेखांचे एकत्रिकरणही अगदी सहज गोष्ट नाही चांगलीच वेळखाऊ गोष्ट असते.
वेगवेगळ्या नावा/उल्लेखांबद्दल विभाग करावे या बाबीशी सहमत आहे , एखादा विभाग खूपच वाढला तर काही वेळा संक्षेप तेवढा विभागात ठेऊन त्याचाही स्वतंत्र लेख बऱ्याचदा होतो नाही असे नाही जसे चंद्रभागा विभागातील धार्मिक सांस्कृतीक वर्णनांबद्दल पुढे मागे अजून एखादा स्वतंत्र लेख होईल आणि त्याचा संक्षेप केवळ भीमा चंद्रभागा नदीत ठेवता येईल, नाही असे नाही पण ही विकिलेखांची रचना नीटशी समजून घेणे गरजेचे आहे.
ज्ञानकोश जग काय म्हणत याची संदर्भासहीत नोंद घेतात पण जग काय म्हणत या बहुसंख्येच्या नियमावर अवलंबून राहात नाहीत. चंद्र चंद्रावरील डागा त्याची ग्रहणे या बद्दलच्या लोकसमजूतींची सुयोग्य ज्ञानकोशीय दखल वेगळ्या विभागात घेता येते (कदाचीत तो विभाग वाढला तर त्याचाही स्वतंत्र लेख होतो) पण चंद्रा बद्दलचा मूळ लेख त्याबद्दल नेमकी माहिती देणारा हवा.तसेच चंद्र आणि मून या बद्दल वेगवेगळे लेख असणे श्रेयस्कर ठरत नाही एवढेच.
या निमीत्ताने आठवण झाली म्हणून,बऱ्याच दिवसांचे इंग्रजी विकिपीडियवरील शिल्लक काम Public legal education नावाचा लेख थोड्याच वेळात Legal awareness नावाच्या लेखात विलीन करून उरकणार आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३६, १ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]