वर्धा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी पाटबंधारे विभाग विकास महामंडळ, नागपूर कडून काम झपाट्याने चालू आहे. हिंगणघाट तालुक्यातील ४८ गावांना सिंचनाची सोय होऊन बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल या प्रकल्पासाठी एकूण १ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे.

संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्‍नेयेस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.

एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.

वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्‍नेय भाग निग्‍न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात.