क्षिप्रा नदी
Jump to navigation
Jump to search

दुथडीस वाहणाऱ्या क्षिप्रा नदीची उज्जैन येथे पूजा करण्यात येत आहे.
क्षिप्रा नदी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी नदी आहे.
विंध्य पर्वतात धारजवळ उगम पावून ही नदी माळव्यातून वाहते व चंबळ नदीस मिळते. क्षिप्रा नदी हिंदू धर्मातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. उज्जैन शहर या नदीच्या काठावर आहे.
हीस शिप्रा नदी असेही म्हणतात.