मांडवी नदी
मांडवी ही पुणे जिल्ह्यातील नदी आहे. नदीचा उगम ओतूर गावाच्या उत्तरेस 20किलोमीटर अंतरावर फोपसंडी गावात दर्याबाई मंदिर येथे अकोले तालुक्यात होतो. आणि नदी नेतवड(तालुका जुन्नर)गावाजवळ पुष्पावती नदीस मिळते. नदीवर ओतूर गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा केटी बंधारा आहे.या नदीवर चिल्हेवाडी या ठिकाणी धरण आहे.
चिल्हेवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची व्याप्ती
[संपादन]जुन्नरपासून २० कि.मी.अंतरावर मांडवी नदीवर चिल्हेवाडी हे मातीचे धरण आहे. धरणाची लांबी ४४० मीटर असून धरणाची एकूण साठवण क्षमता २७.७ लक्ष घन मीटर (०.९६ टी.एम.सी.) इतकी आहे. चिल्हेवाडी धरणापासून ४४.३० कि.मी.लांबीचा कालवा असून त्याद्वारे एकूण ६३७२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होऊ शकेल. कालव्याच्या उजव्या तीरावरील क्षेत्र खाजगी उपसा सिंचन योजनांद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.
पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
सद्यःस्थिती –
सिंचन क्षेत्र | |
मथळा | मजकूर |
---|---|
जी.सी.ए | ७०६० हेक्टर |
सी.सी.ए. | ७१६५ हेक्टर |
आय.सी.ए. | ६३७२ हेक्टर |
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या