Jump to content

सीना नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सीना या पानावरून पुनर्निर्देशित)
सीना
उगम ससेवाडी, अहमदनगर
मुख अहमदनगर
पाणलोट क्षेत्रामधील देश अहमदनगर, बीड, सोलापूर
उगम स्थान उंची ३०० मी (९८० फूट)
उपनद्या खार ओढा,शेर नदी,मनकर्णा , बाणगंगा,भिंगार नाला, तुक्कड ओढा, विंचरणा नदी, तिरा नदी, साखरी ओढा, भोंगाळा, घोरडा ओढा, बेंद नाला मेहेकरी नदी (मेहेकरी नदी प्रमुख उपनदी) भोगावती नदी
धरणे सीना कोळेगाव/निमगाव गंगारडा/ उंदरगाव

सीना नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर, धाराशिवसोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.

नगर शहरा पासून दक्षिण दिशेकडे नगर शहरापासून १६. किमी अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे. या ठिकाणी श्री राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी बांधणीचे बांधकाम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे. या मंदिराचे बांधकाम ९५० वर्षा पुवीॅचे आहे असे पुरावे देखील आढळतात. दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे.

सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे, तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला, पुणे महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे.

सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2 ते 3 कि. मी. अंतरावर आहे. पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.

नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील परांडा तालुका ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. बीड जिल्ह्यातील वाकी येथे महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे.करमाळा तालुक्यातील संगोबा येथे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे. नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदिरे आहेत. मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे रामदास स्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे. तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलाशयाला 'कल्याण सागर' असे म्हणतात. जवळच सोनारी येथे कालभैरवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.

सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.पुढे येऊन सिना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते. ती नदी करमाळा येथे येऊन माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सीना नदीच्या तीरावरील उंदरगाव हे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पवनपुत्र हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, श्री राम,श्री दत्त, श्री गणपती, श्री महादेव, नरसिंह, विठ्ठल बिरूदेव, अंबाबाई, खंडोबा इ. मंदिरे आहेत. माढा-वैराग रोड या गावातून जातो. सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन्ही किनाऱ्यावर असणाऱ्या उंदरगाव आणि केवड या गावांना जोडतो.गुंडूबा तथा गुंडेश्वर आणि तेली महाराजांचे मंदिर उंदरगाव व वाकाव या गावावरील सीमेवर आणि सीना नदीच्या किनारी आहे. सीना नदीला उंदरगाव येथे बेंद नाला, घोरडा नाला आणि भोंगाळा नाला मिळतो. तसेच मनकर्णा नदी ही सीना नदीची एक उपनदी आहे.केवड या ठिकाणी नदी तीरावर काळभैरवनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त येथे मोठा उत्सव भरतो. नदीच्या पश्चिमेला इंग्रज तर पूर्वेला निजामच्या साम्राज्याच्या खुणा आजही या गावात पाहायला मिळतात. सीना नदीमुळे परिसरातील बागायती शेतीत वाढ झाली आहे. उंदरगाव परिसरात सीना नदीला सीमामाई असे संबोधले जाते.उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे सीना नदीच्या काठी प्राचीन असे नरसिंह मंदिर आहे . सीना नदी पुढे दक्षिण सोलापूर कुडल संगम येथे भीमा नदीला जाऊन मिळते कूडल संगम येथे संगमेश्वर प्राचीन कालीन मंदिर आहे.[]