नरसिंगपूर-नीरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरसिंगपूर-नीरा हे गाव पुणें जिल्ह्यातील इंदापूरच्या आग्नेयेस १२ मैलांवर भीमानीरेच्या संगमावर आहे. येथें श्री लक्ष्मीनरसिंहाचें देवालय आहे. विंचूरकरांनीं हें देवालय शके १६७८ मध्ये बांधिलें. वैशाख शुद्ध चतुर्दशीपासून येथें दोन दिवस जत्रा भरते.