झेलम नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झेलम
Jhelum River-Pakistan.jpg
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य
उगम वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत: जम्मू आणि काश्मीर
पाकिस्तान: पंजाब
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
ह्या नदीस मिळते सिंधू नदी
उपनद्या नीलम नदी, कुन्हार नदी
धरणे मंग्ला धरण

झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

इतिहास[संपादन]

झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes) या नावाने ओळखत.

प्रवाह[संपादन]

झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झर्‍यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.