एर्विन श्र्यॉडिंगर
एर्विन श्र्यॉडिंगर | |
पूर्ण नाव | एर्विन श्र्यॉडिंगर |
जन्म | १२ ऑगस्ट, इ.स. १८८७ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी |
मृत्यू | ४ जानेवारी, इ.स. १९६१ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया |
नागरिकत्व | ऑस्ट्रिया, आयर्लंड |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रियन, आयरिश |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | ब्रेस्लाउ विद्यापीठ, त्स्युरिख विद्यापीठ, बेर्लिनचे हुंबोल्ट विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ग्रात्स विद्यापीठ, डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज |
प्रशिक्षण | व्हिएन्ना विद्यापीठ |
ख्याती | श्र्यॉडिंगर समीकरण, श्र्यॉडिंगरचे मांजर |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर (चुकीचे रूढ लेखनभेद: एर्विन श्रॉडिंजर, एर्विन श्रॉडिंगर; जर्मन: Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger) (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ - ४ जानेवारी, इ.स. १९६१) हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंजयामिकीतील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय श्र्यॉडिंगरचे मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]श्र्य्रॉडिंगर यांचा जन्म १२ ऑगस्ट १८८७ रोजी ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या शहरात झाला. त्यांचे वडील रुडोल्फ श्र्य्रॉडिंगर हे वनस्पतीशास्रज्ञ तर आई जॉर्जिने एमिलीया ब्रेन्डा या रसायनशास्राच्या प्राध्यापिका होत्या. एर्विन हे या दोघांचे एकमेव अपत्य. १९०६ ते १९१० या कालावधीत त्यांनी व्हिएन्नामधेच शिक्षण घेतले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एर्विन श्र्यॉडिंगर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
- "एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (जर्मन आवृत्ती)" (जर्मन भाषेत). 2007-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-08 रोजी पाहिले.
- "एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (इंग्लिश आवृत्ती)" (जर्मन भाषेत). 2006-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-08 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |