जकात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुस्लिम लोकांनी आपल्या संचयित संपत्तीतुन २.५ % इतकी संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करावी असा आदेश आहे. या दान करावयाच्या संपत्तीलाच जकात असे म्हणतात.

जकात देणे एक मुस्लीम साठी फर्ज ( बंधनकारक) आहे परंतु जर त्याची ऐपत नसेल तर ती माफ आहे. आणि ऐपत ठरवण्यासाठी नियम असा आहे की आपल्या कडे ७ तोळे पेक्षा जास्त "सोनं" आहे तर आपल्यावर जकात लागू होईल. ईस्लामिक राज्यात जकात ही शासनाकडून गोळा केली जाते आणि तिचे व्यवस्थापनसुद्धा शासन करते. बिगर ईस्लामिक राज्यात मुस्लीम लोक गोर गरीब गरजू लोकांना किंवा धार्मिक संस्थांना स्वतः दान करतात. किंवा जकात चे पैशे एखाद्या अश्या धार्मिक संस्थेला देवून टाकतात कि जे त्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने करतात. जकात वर्षातून एकदा द्यायची असते आणि रमझानच्या महिन्यात देण्यात येते.