भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१ | |||||
इंग्लंड महिला | भारत महिला | ||||
तारीख | १६ जून – १५ जुलै २०२१ | ||||
संघनायक | हेदर नाइट | मिताली राज (म.कसोटी, म.ए.दि.) हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | हेदर नाइट (९५) | शफाली वर्मा (१५९) | |||
सर्वाधिक बळी | सोफी एसलस्टोन (८) | स्नेह राणा (४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नॅटली सायव्हर (१४२) | मिताली राज (२०६) | |||
सर्वाधिक बळी | सोफी एसलस्टोन (८) | झुलन गोस्वामी (३) पूनम यादव (३) दीप्ती शर्मा (३) | |||
मालिकावीर | सोफी एसलस्टोन (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॅनियेल वायट (१२३) | स्म्रिती मंधाना (११९) | |||
सर्वाधिक बळी | नॅटली सायव्हर (३) सोफी एसलस्टोन (३) कॅथेरिन ब्रंट (३) |
पूनम यादव (३) शिखा पांडे (३) | |||
मालिकावीर | नॅटली सायव्हर (इंग्लंड) | ||||
Series points | |||||
इंग्लंड महिला १०, भारत महिला ६ |
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यात एकमेव महिला कसोटी खेळणार असल्याने जाहीर केले. एप्रिल २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.
एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. सन १९९९ मध्ये अंजू जैन आणि चंद्रकांता यांनी भारतातर्फे पहिल्या गड्यासाठी रचलेल्या १३२ धावांच्या भागीदारीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्म्रिती मंधाना यांनी १५८ धावांची सलामी भागीदारी रचत मोडला. इंग्लंडने भारतावर फॉलो-ऑन लादून देखील दुसऱ्या डावात स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने डावाच्या फरकाने पराभव टाळत सामना अनिर्णित ठेवला. भारताची इंग्लंडमध्ये एकही महिला कसोटी सामना न हरण्याची परंपरा कायम राहिली.
इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारात मायदेशात १००वा विजय नोंदवला. दुसरा सामना देखील ५ गडी राखून जिंकत इंग्लंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने तिसरा एकदिवसीय सामना ४ गडी राखून जिंकला. इंग्लंडने महिला एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय संपादन केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताची कर्णधार मिताली राज हिने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील १०,२७३ धावांचा विक्रम मोडत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी आघाडीची क्रिकेट खेळाडू ठरली.
इंग्लंड महिलांनी ट्वेंटी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि गुण पद्धतीनुसार संपूर्ण दौरा १०-६ अश्या फरकाने जिंकला.
महिला कसोटी मालिका
[संपादन]एकमेव महिला कसोटी
[संपादन]१६-१९ जून २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी चहापानानंतरचा खेळ होऊ शकला नाही.
- सोफिया डंकली (इं), तानिया भाटिया, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि शफाली वर्मा (भा) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - २.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
२०२/२ (३४.५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- सोफिया डंकली (इं) आणि शफाली वर्मा (भा) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०
२रा सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
२२५/५ (४७.३ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
भारत
२२०/६ (४६.३ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
- गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
भारत
५४/३ (८.४ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे भारताला ८.४ षटकांमध्ये ७३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
१४०/८ (२० षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- गुण : भारत महिला - २, इंग्लंड महिला - ०.
३रा सामना
[संपादन]