Jump to content

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक
चित्र:1973 Women's Cricket World Cup logo.png
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक अधिकृत प्रतिक चिन्ह
दिनांक २० जून – २८ जुलै १९७३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान इंग्लंड इंग्लंड
वेल्स वेल्स
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
सहभाग
सामने २१
सर्वात जास्त धावा इंग्लंड एनीड बेकवेल (२६४)
सर्वात जास्त बळी इंग्लंड(यं.इं.) रोझलिंड हेग्स (१२)
(नंतर) १९७८

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९७३ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. क्रिकेट खेळामध्ये पुरुष अथवा महिला प्रकारात प्रथमच अशी बहुदेशीय स्पर्धा भरवली गेली. पुरुषांच्या विश्वचषकाआधी दोन वर्षे ही क्रिकेटमधील पहिली विश्वचषक स्पर्धा होती. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. यजमान इंग्लंड संघाने पहिली वहिली स्पर्धा जिंकली. या विश्वचषकाचा जन्म एका प्रसिद्ध उद्योगपति सर जॅक हेवर्ड यांच्या संकल्पनेतून झाला. त्यांनीच या स्पर्धेच्या आयोजनासाठी ४०,००० युरो इतके भांडवल देऊ केले.

या विश्वचषकात एकूण ७ संघांनी सहभाग घेतला. १९७१ मध्ये दक्षिण आफ्रिकेवर वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कृत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला या स्पर्धेत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे तत्कालिन ३ महिला कसोटी देश : यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड; आणि जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या देशांच्या महिला संघांना आमंत्रित करण्यात आले. तेव्हा अजून वेस्ट इंडीजचा महिला संघ अस्तित्वात नव्हता. आणखी दोन संघांनी यात भाग घेतला: आंतरराष्ट्रीय XI आणि इंग्लंडमधून २३ वर्षांखालील एक संघ यंग इंग्लंड. विश्वचषकात खेळवला गेलेला पहिला सामना हा जगातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. सर्व ७ संघांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

विश्वचषक स्पर्धेतील सामने हे फक्त साखळी पद्धतीत खेळवले गेले. इंग्लंड महिला एकूण खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये ५ जिंकत २० गुण घेऊन गुणफलकात अव्वल राहिल्याने पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषक यजमान इंग्लंडने जिंकला. इंग्लंडच्या एनीड बेकवेल हीने स्पर्धेतील सर्वाधिक २६४ धावा बनविल्या तर यंग इंग्लंडच्या रोझलिंड हेग्स हिने सर्वाधिक १२ बळी घेतले.

सहभागी देश

[संपादन]
देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड यजमान, महिला संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया महिला संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पदार्पण पदार्पण पदार्पण
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो आमंत्रित पदार्पण पदार्पण पदार्पण
जमैकाचा ध्वज जमैका पदार्पण पदार्पण पदार्पण
इंग्लंड यंग इंग्लंड पदार्पण पदार्पण पदार्पण
आंतरराष्ट्रीय XI पदार्पण पदार्पण पदार्पण

मैदाने

[संपादन]

इंग्लंडमधील मैदाने

[संपादन]
मैदान शहर सामने संख्या
क्यू ग्रीन लंडन
डीन पार्क मैदान डॉर्सेट
काउंटी मैदान होव
क्लॅरेन्स पार्क सेंट अल्बान्स
ट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान ट्रिंग
क्वीन्स पार्क चेस्टरफील्ड
गोर कोर्ट सिटिंगबोर्न
इलिंग क्रिकेट क्लब मैदान लंडन
हेस्केथ पार्क डार्टफोर्ड
पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान ब्रॅडफोर्ड
मॅनोर फिल्ड मिल्टन केन्स
यॉर्क क्रिकेट क्लब यॉर्क
द मायेर मैदान एक्झमॉथ
इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान कर्बी मक्सलो
फेनर्स मैदान केंब्रिज
व्हॅलेन्टाइन्स पार्क इलफोर्ड
एगबर्थ क्रिकेट मैदान लिव्हरपूल
वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान वूलवरहॅम्प्टन
द सॅफ्रॉन्स ईस्टबोर्न
एजबॅस्टन बर्मिंगहॅम

वेल्समधील मैदाने

[संपादन]
वेल्समधील मैदाने
मैदान शहर सामने संख्या
सेंट हेलेन्स स्वॉन्झी
  • लंडन मधील क्यू ग्रीन हे इंग्लंडमध्ये महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे पहिले मैदान ठरले.
  • वेल्स मधील सेंट हेलेन्स हे वेल्समध्ये महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे पहिले मैदान ठरले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (वि) २०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३
आंतरराष्ट्रीय XI १३
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
जमैकाचा ध्वज जमैका
इंग्लंड यंग इंग्लंड
संघ
गट फेरी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ १६ १७ १७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ १६ २०
आंतरराष्ट्रीय XI १२ १३
जमैकाचा ध्वज जमैका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
इंग्लंड यंग इंग्लंड
विजय पराभव सामना अणिर्नित
टीप: प्रत्येक साखळी सामन्याच्या शेवटी गुण दर्शविलेले आहेत.
टीप: सामन्याची पाहिती पाहण्यासाठी साखळी सामन्यांच्या गुणांवर किंवा बाद फेरीच्या वि/प वर क्लिक करा.

गट फेरी

[संपादन]

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -





















साचा:१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक