पेरू (देश)
| पेरू República del Perú पेरूचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| राष्ट्रगीत:
सोमोस लिब्रेस, सेआमोस्लो सीएंप्रे ('आपण स्वतंत्र आहोत, नेहमीच राहू') |
|||||
| पेरूचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
लिमा |
||||
| अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
| इतर प्रमुख भाषा | किशुआ, आयमारा | ||||
| सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
| - राष्ट्रप्रमुख | अॅलन गार्शिया | ||||
| - पंतप्रधान | होर्हे देल कास्तियो | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्वातंत्र्य | स्पेनपासून | ||||
| - घोषणा | २८ जुलै १८२१ | ||||
| - संयुक्तीकरण | ९ डिसेंबर १८२४ | ||||
| - मान्यता | १४ ऑगस्ट १८७९ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १२,८५,२१६ किमी२ (२०वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | ०.४१ | ||||
| लोकसंख्या | |||||
| - २०१० | २,९४,९६,००० (४०वा क्रमांक) | ||||
| - घनता | २३/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | २९९.६५ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (४९वा क्रमांक) | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ९,९८५ अमेरिकन डॉलर (९५वा क्रमांक) | ||||
| मानवी विकास निर्देशांक (२०१०) | ▲०.७२३[२] (उच्च) (६३ वा) | ||||
| राष्ट्रीय चलन | नुएव्हो सोल (PEN) | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | (यूटीसी -५) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .pe | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +५१ | ||||
पेरूचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Perú,
उच्चार ) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
आजच्या घडीला पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
नावाची व्युत्पत्ती [संपादन]
प्रागैतिहासिक कालखंड [संपादन]
स्पॅनिश कालखंड [संपादन]
भूगोल [संपादन]
१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये प्रशांत महासागराच्या किनार्यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, आन्देस तसेच अॅमेझॉन नदीच्या खोर्यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. अॅमेझॉनचा उगम पेरू च्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. उकायाली व मारान्योन ह्या अॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या सीमेवर स्थित आहे. विषुववृत्ताच्या जवळ असून देखील पेरूमधील हवामान तीव्र नाही.
चतु:सीमा [संपादन]
पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
राजकीय विभाग [संपादन]
पेरू देश एकूण २५ प्रदेश व लिमा ह्या प्रांतामध्ये विभागला गेला आहे.
मोठी शहरे [संपादन]
सुमारे २.९५ कोटी (दक्षिण अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर) लोकसंख्या असलेल्या पेरू देशामधील ७५% जनता शहरांमध्ये राहते. लिमा, अरेकिपा, त्रुहियो, चिक्लायो ही येथील प्रमुख शहरे आहेत.
समाजव्यवस्था [संपादन]
वस्तीविभागणी [संपादन]
धर्म [संपादन]
शिक्षण [संपादन]
संस्कृती [संपादन]
राजकारण [संपादन]
अर्थतंत्र [संपादन]
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- सरकारी संकेतस्थळ
- पेरू एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकावरील माहिती
- पेरूचे विकिमिडिया अॅटलास
विकिव्हॉयेज वरील पेरू पर्यटन गाईड (इंग्रजी)