शांघाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांघाय
上海市
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

Shanghai montage.png
वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : पूतोंगाची आकाशरेखा, यू बाग, इ.स. २०१० एस्क्पोचे चीन पॅव्हिलियन, निऑन दिव्यांनी झगमगणारा नांजिंग रस्ता, षांघाय बंड
शांघाय is located in चीन
शांघाय
शांघायचे चीनमधील स्थान

गुणक: 31°12′0″N 121°30′0″E / 31.2, 121.5गुणक: 31°12′0″N 121°30′0″E / 31.2, 121.5

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य -
स्थापना वर्ष ५ - ७ शतक
महापौर हान चंग
क्षेत्रफळ ७,०३७ चौ. किमी (२,७१७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८८,८४,६००
  - घनता २,६८३.६ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.shanghai.gov.cn/


षांघाय, रूढ लेखन शांघाय, (अन्य लेखनभेद: षांगहाय, शांगहाय, शंघाई, शांघाई ; सोपी चिनी लिपी: 上海; फीनयीन: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); वू: Zånhae; आयपीए: [zɑ̃'he]), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे[१]. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या षांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख वित्तीय केंद्र असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर[२] आहे.

चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे षांघाय यांगत्से नदीच्या मुखापाशी वसले आहे. षांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा च्यांग्सू आणि च-च्यांग या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: