मेरियाना गर्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान

मेरियाना गर्ता (इंग्लिश: Mariana Trench) हा प्रशांत महासागराच्या तळावरील एक भूभाग आहे. समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता हे पृथ्वीवरील सर्वात खोल स्थान मानले जाते. हा गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तो जपानच्या दक्षिणेला व फिलिपिन्सच्या पूर्वेला स्थित आहे. चॅलेंजर डीप ह्या बिंदूला मेरियाना गर्त्याची सर्वाधिक खोली आढळून येते.

ह्याची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणासोबत करायची म्हटले तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतक्या उंचीवर आहे. मेरियाना गर्त्यात वरील पाण्याचा दाब १,०८६ बार इतका असून तो वातावरणातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.

आजवर हा गर्ता गाठण्याचे तीन यशस्वी प्रयत्न झाले आहेत.


बाह्य दुवे[संपादन]


गुणक: 11°21′N 142°12′E / 11.35, 142.2