सुवर्ण चतुष्कोण
(सुवर्ण चतुष्कोन या पानावरून पुनर्निर्देशित)

सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे. ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.
ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकूण लांबी ५,८४६ किमी आहे.[१].
सुवर्ण चतुष्कोणासाठी वापरले जाणारे राष्ट्रीय महामार्ग[२][संपादन]
- दिल्ली-मुंबई पट्टा: रा. म. ८, रा. म. ७६, रा. म. ७९
- मुंबई-चेन्नई पट्टा: रा. म. ४, रा. म. ७, रा. म. ४६
- चेन्नई-कोलकाता पट्टा: रा. म. ६, रा. म. ५
- कोलकाता-दिल्ली पट्टा: रा. म. २
प्रमुख शहरे[संपादन]
दिल्ली-कोलकाता पट्टा | दिल्ली-मुंबई पट्टा | कोलकाता-चेन्नई पट्टा | मुंबई-चेन्नई पट्टा |
---|---|---|---|
उल्लेखनीय[संपादन]
- राष्ट्रीय महामार्गांचे खालील पट्टे सुवर्ण चतुष्कोण आणि पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर दरम्यान समान आहेत:
संदर्भ[संपादन]
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-05-15. 2008-12-29 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-01-26. 2009-01-05 रोजी पाहिले.