राष्ट्रीय महामार्ग १
Appearance
राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.
राष्ट्रीय महामार्ग १ | |
---|---|
राष्ट्रीय महामार्ग १ चे नकाशावरील स्थान | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | ५३४ किलोमीटर (३३२ मैल) |
सुरुवात | श्रीनगर |
शेवट | लेह |
स्थान | |
शहरे | श्रीनगर, बारामुल्ला, द्रास, कारगिल, लेह |
राज्ये | जम्मू आणि काश्मीर, लडाख |
राष्ट्रीय महामार्ग १ (National Highway 1) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर व लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १ डी ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग श्रीनगरला लेहसोबत जोडतो. हिमालयामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेच्या जवळून धावतो. बारामुल्ला, सोनमर्ग, झोजी ला, द्रास, कारगिल इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत.
लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: लेह-मनाली महामार्ग).
जुळणारे प्रमुख महामार्ग
[संपादन]- लेह - राष्ट्रीय महामार्ग ३
- कारगिल - राष्ट्रीय महामार्ग ३०१
- श्रीनगर - राष्ट्रीय महामार्ग ४४