"नारायण सुर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →पुरस्कार |
|||
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
* [[मध्यप्रदेश]] सरकारचा कबीर पुरस्कार |
* [[मध्यप्रदेश]] सरकारचा कबीर पुरस्कार |
||
* [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९९८) |
* [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९९८) |
||
⚫ | |||
==नारायण सुर्वे यांच्या नावाचे पुरस्कार== |
|||
⚫ | |||
== गौरव == |
== गौरव == |
२२:२३, १४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
नारायण सुर्वे | |
---|---|
जन्म नाव | नारायण गंगाराम सुर्वे |
जन्म | ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ |
मृत्यू | ऑगस्ट १६, इ.स. २०१० |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
पत्नी | कृष्णाबाई |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८) |
नारायण गंगाराम सुर्वे (ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १६, इ.स. २०१०) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.
जीवन
नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले [१]. गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत असे, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरी करत.
गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला [ संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.
प्रकाशित साहित्य
काव्य संग्रह
पुरस्कार
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)
- मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)
नारायण सुर्वे यांच्या नावाचे पुरस्कार
- रयत शिक्षण संस्थेचे अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार (१५ सप्टेंबर २०१७)
गौरव
- नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
नारायण सुर्वे कला अकादमी
तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे. नारायण सुर्व्यांच्या पत्नी कृष्णाबाई या अकादमीच्या सध्याच्या(२०१२) कार्यकारी विश्वस्त आहेत. डिसेंबर २०१२मध्ये सोलापूरचे कवी माधव पवार यांची अकादमीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे
- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6322351.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |