वामन रामराव कांत
Appearance
(वा.रा.कांत या पानावरून पुनर्निर्देशित)
वा.रा. कांत | |
---|---|
जन्म नाव | वामन रामराव कांत |
टोपणनाव | रसाळ वामन, अभिजित, आणि कांत |
जन्म |
ऑक्टोबर ६, १९१३ नांदेड, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
सप्टेंबर ८, १९९१ मुंबई ,महाराष्ट्र,भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, समीक्षा , अनुवाद, नाट्यलेखन |
अपत्ये | ३ मुले २ मुली |
वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६, १९१३ - सप्टेंबर ८, १९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.
जीवन
[संपादन]वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
नोकरी व्यवसाय
[संपादन]- 'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
- निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
- निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
- भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
- आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
गाजलेल्या कविता/गाणी
[संपादन]- आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको
- त्या तरुतळी विसरले गीत
- बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
- राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?
- सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा
काव्यसंग्रह(एकूण १० )
[संपादन]- 'दोनुली'
- ’पहाटतारा’
- ’बगळ्यांची माळ’
- 'मरणगंध' (नाट्यकाव्य)
- 'मावळते शब्द'
- 'रुद्रवीणा'
- 'वाजली विजेची टाळी'
- 'वेलांटी'
- ’शततारका’ (१९५०)
- ’सहज लिहिता लिहिता’
चरित्र
[संपादन]वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
पुरस्कार
[संपादन]- १९६२-६३ 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
- १९७७-७८ 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
- १९७९-८० ' दोनुली' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
- १९८९-९० 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार
सन्मान
[संपादन]- १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
- १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
- १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रकाशित साहित्य
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
पहाटतारा | कवितासंग्रह | विचाराविहार मंडळ प्रकाशन, नांदेड | १९३० |
फटत्कार | कवितासंग्रह | विचाराविहार मंडळ प्रकाशन,नांदेड | १९३३ |
रुद्रवीणा | कवितासंग्रह | प्रतिभा प्रकाशन , औरंगाबाद | १९४७ |
शततारका | कवितासंग्रह | धृव प्रकाशन, परभणी | १९५० |
वेलांटी | कवितासंग्रह | मौज प्रकाशन, मुंबई | १९६२ |
वाजली विजेची टाळी | कवितासंग्रह | मौज प्रकाशन, मुंबई | १९६५ |
मरणगंध | नाट्यकाव्य | काँटिनेंटल प्रकाशन, मुंबई | १९७६ |
दोनुली | काव्यसंग्रह | मौज प्रकाशन, मुंबई | १९७९ |
मावळते शब्द | काव्यसंग्रह | मौज प्रकाशन, मुंबई | १९८८ |
बाह्य दुवे
[संपादन]