Jump to content

पी.एस. श्रीधरन पिल्लई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई

विद्यमान
पदग्रहण
१५ जुलै २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मागील भगतसिंग कोश्यारी (अतिरिक्त कार्यभार)

कार्यकाळ
५ नोव्हेंबर २०१९ – ६ जुलै २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मागील जगदीश मुखी
पुढील कमभमपती हरी बाबू

जन्म १ डिसेंबर, १९५४ (1954-12-01) (वय: ६९)
वेनमोनी, अलाप्पुझा, केरळ, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अ‍ॅड. के रिटा
अपत्ये
शिक्षण बीए, एलएलबी

पी.एस. श्रीधरन पिल्लई (जन्म १ डिसेंबर १९५४) हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत, जे सध्या गोवा राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते. याशिवाय, ते यापूर्वी अनेक वेळा केरळ राज्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

श्री पिल्लई यांनी पंडालम एनएसएस कॉलेजमधून कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. ते कॉलेज युनियनचे निवडून आलेले पदाधिकारी होते. नंतर, त्यांनी कालिकत लॉ कॉलेजमधून १९७८ मध्ये कायद्याची पदवी घेतली. लॉ कॉलेजमधील त्यांच्या कार्यकाळात, श्री पिल्लई त्यांच्या कार्यकाळातील कॉलेज मॅगझिनचे संपादक होते, ज्याने आणीबाणी आणि इंदिरा गांधी सरकारचा निषेध केला होता, त्या वेळी त्याबद्दल खूप चर्चा झाली होती.

राजकीय कारकीर्द

[संपादन]
  • राज्य संयोजक, लोक तांत्रिक युवा मोर्चा
  • लोकसंघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनेचे नेते (आणीबाणी विरोधी आंदोलन)
  • जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव – युवा मोर्चा (१९८० नंतर)
  • अध्यक्ष, बार असोसिएशन, कोझिकोड (१९९५)
  • व्यवस्थापकीय संपादक, जन्मभूमी मल्याळम दैनिक
  • वरिष्ठ केंद्र सरकारचे स्थायी वकील, केरळ उच्च न्यायालय (सहायक सॉलिसिटर जनरल) - २००१-२००३
  • CBI स्थायी वकील - केरळ उच्च न्यायालय (२००१-२००२)
  • केरळ अध्यक्ष, आत्या-पाट्या स्पोर्ट्स असोसिएशन
  • केरळ सल्लागार, बुद्धिबळ संघटना
  • जिल्हाध्यक्ष, कबडी असोसिएशन
  • राज्य अध्यक्ष, केरळ पब्लिशर्स अँड रायटर्स असोसिएशन
  • जिल्हाध्यक्ष, मार्शल आर्ट्स
  • भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
  • लक्षद्वीपसाठी भाजप केंद्रीय प्रभारी (लक्षद्वीपमध्ये भाजपची स्थापना)
  • जिल्हाध्यक्ष (केरळ राज्य भाजपा)
  • प्रदेश सचिव (केरळ राज्य भाजपा)
  • प्रदेश सरचिटणीस (केरळ राज्य भाजपा)
  • उपाध्यक्ष आणि प्रवक्ता (केरळ राज्य भाजपा)
  • अध्यक्ष (केरळ राज्य भाजपा २००३-२००६ आणि २०१८-२०१९)
  • मिझोरामचे २१वे राज्यपाल (५ नोव्हेंबर २०१९ ते १४ जुलै २०२१).[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Present Governor | Raj Bhavan Goa". www.rajbhavan.goa.gov.in. 2022-03-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-19 रोजी पाहिले.