Jump to content

दत्तात्रय लक्ष्मण गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द. ल. गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)
द.ल. गोखले
जन्म नाव दत्तात्रय लक्ष्मण गोखले [ दुजोरा हवा]
जन्म १५ जुलै १८९९ [ दुजोरा हवा]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

द.ल. गोखले (पूर्ण नाव दत्तात्रय लक्ष्मण गोखले) [ दुजोरा हवा] (१५जुलै १८९९[ दुजोरा हवा] मृत्यू :?) हे मराठी कवी होते. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते. द.ल. गोखले ह्यांच्याबद्दल लिखित माहिती फारशी दिसत नाही, मात्र इतरांच्या लेखनातून त्रोटक उल्लेख आढळतात. मराठी विश्वकोशातही 'मंडळाचे एक सदस्य द.ल. गोखले हे जातिवंत रसिक आणि अभ्यासक असूनही मराठी साहित्यात त्यांनी विशेष भर घातली नाही' असे म्हणले आहे.[]

साहित्य

[संपादन]

द.ल. गोखले यांच्या 'किरण' या प्रातिनिधिक संग्रहात 'प्रेम कशावर' ही कविता व 'भावगीत' या विषयावर चर्चात्मक निबंध आहे. आणि 'उषा, शलाका, प्रभा' आदींमध्ये त्यांची सुनीते व गोष्टी समाविष्ट आहेत.[][ दुजोरा हवा]

इतरांच्या लेखनातील द.ल. गोखले ह्यांच्याविषयी उल्लेख

[संपादन]

आमची अकरा वर्षे मधील उल्लेख

[संपादन]

माधवरावांच्या पत्‍नी लीलाबाई ह्यांच्या 'आमची अकरा वर्षे' ह्या पुस्तकात द.ल. गोखले ह्यांच्याविषयी मजकूर आहे. त्यावरून कळते की माधवराव से.अ‍ॅ.सोसायटीचे आजीव सदस्य झाले तेव्हा गोखले फर्ग्यूसन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते (इ.स. १९२१). माधवराव कोल्हापूरला गेले तेव्हा श्री.गोखले सांगली येथे वास्तव्यास होते. (विलिंग्डन कॉलेज?)[ दुजोरा हवा]. त्याच पुस्तकात त्यांचा उल्लेख माधवरावांच्या लांबच्या पायी प्रवासाच्या आवडीविषयी लिहिताना येतो. माधवरावांना लांबलांबचे प्रवास पायी करून गावे आणि गडकिल्ले पाहण्याची फार आवड होती. अशाच पुणे ते बनेश्वर प्रवासात द.ल.गोखलेहि होते.

’स्वप्नभूमि’मधील उल्लेख

[संपादन]

शं.के.कानेटकर लिखित 'स्वप्नभूमि' मध्ये द.ल.गोखले ह्यांचे उल्लेख विखरून सापडतात. विशेष म्हणजे त्या पुस्तकातील अनेक छायाचित्रांमध्ये ते आणि त्यांच्या पत्‍नी सुमतीबाईही आहेत. २७ सप्टेंबर १९६५ ह्या दिवशी पुणे विद्यापीठात उपकुलगुरू काकासाहेब गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली रविकिरण मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा वृत्तान्त 'भटक्या' ह्या टोपणनावाने लिहिलेला 'स्वप्नभूमि'मध्ये छापलेला आहे. त्यात अन्य कवींबरोबर द.ल.गोखले ह्यांचाहि अल्पपरिचय करून देताना म्हणले आहे की, ”त्यांची काव्यनिर्मिति 'तोटकी आणि मोजकी' तरीहि 'सुगम, सुश्राव्य आणि सुंदर' होती.” पुस्तकात सर्व उपस्थित कवि आणि उपकुलगुरू गाडगीळ ह्यांचा व्यासपीठावर बसलेला फोटो आहे. त्यात द.ल.गोखले दिसतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मराठी विश्वकोशः रविकीरण मंडळ".
  2. ^ http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-konkan-agrarian-univaersity-150072/

बाह्य दुवे

[संपादन]
  • ऐसी अक्षरे: [१]