Jump to content

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे मूळ संपूर्ण नाव न वापरता वेगळ्याच नावाने साहित्य निर्मितीत वापरलेल्या नावाला टोपण नाव म्हणतात. मराठीले अनेक लेखक टोपणनावाने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

  • (?) अप्पा बळवंत
  • (?) (वामनसुता)
  • (?) (देशभगिनी)
  • (?) (लक्ष्मीतनया)

मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवी-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. (अपवाद - सौमित्र)

काही मराठी आणि अन्य कवी/लेखकांच्या टोपणनावांची ही यादी :

टोपण नावखरे नाव
अकिंचनवासू. ग. मेहेंदळे
अनंततनयदत्तात्रेय अनंत आपटे
अनंतफंदीअनंत भवानीबावा घोलप
अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबाविठ्ठल अनंत पिंपळगावकर
आनंद साधलेआत्माराम नीलकंठ साधले; दमयंती सरपटवार
अनिलआत्माराम रावजी देशपांडे
अनिल भारतीशान्ताराम पाटील (या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)
अशोक (कवी)नारायण रामचंद्र मोरे
अज्ञातवासीदिनकर गंगाधर केळकर
आधुनिकनीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंदविनायक लक्ष्मण बरवे
आनंदतनयगोपाळ आनंदराव देशपांडे
आरती प्रभूचिंतामण त्र्यंबक खानोलकर
इंदिराइंदिरा संत
इंदुकांतदिनकर नानाजी शिंदे
उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/उद्धव xxxx कोकिळ
एकनाथ, एकाजनार्दनएकनाथ सूर्यनारायण पैठणकर
एक मित्र, विनायकविनायक जनार्दन करंदीकर
कलापी, बालकवीत्र्यंबक बापूजी ठोंबरे
कबीर[[]]
कवीश्वरबासभानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर
कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठलविठ्ठल अनंत पिंपळगावकर
कांतवा.रा. कांत
काव्यविहारीधोंडो वासुदेव गद्रे
काव्यशेखरभास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमरकृष्णाजी लक्ष्मण सोमण
कवी कुंजविहारीहरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधवस.अ. शुक्ल
कुसुमाग्रजविष्णू वामन शिरवाडकर
कृष्णकेशवअनुपलब्ध
कृष्णाग्रजअनुपलब्ध
केशवकुमारप्रल्हाद केशव अत्रे
केशवसुतकृष्णाजी केशव दामले
केशवसुतनारायण केशव बेहेरे
के.स.रि.केशव सदाशिव रिसबूड
कोणीतरीनरहर शंकर रहाळकर
गिरीशशंकर केशव कानेटकर
गोपिकातनयाकु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)
गोपीनाथगोपीनाथ तळवलकर
गोमा गणेशगणेश कृष्ण फाटक
गोविंदगोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंदपौत्रश्रीधर व्यंकटेश केतकर
गोविंदप्रभुगुंडम अनंतनायक राऊळ
गोविंदाग्रजराम गणेश गडकरी
ग्यानबा, रा. म.शास्त्रीवि.ग. कानिटकर
ग्रेसमाणिक गोडघाटे
चक्रधरश्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखरचंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
चेतोहरपरशुराम नारायण पाटणकर
जगन्नाथजगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्ररेव्हरंड नारायण वामन टिळक
जननीजनकजपु.पां गोखले
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वतीवासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथसखाराम केरसुणे
तुकाराम/तुकातुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
तुलसीदास[[]]
दत्तदत्तात्रय कोंडो घाटे
दमयंती सरपटवारआनंद साधले, [[आत्माराम नीलकंठ साधले]
दया पवारदगडू पवार
दामोदरवीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दा.ग.पा.दामोदर गणेश पाध्ये
दासोपंत/ दिगंबरानुचरदासो दिगंबर देशपांडे
दित्जू/माधव जूलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
नामदेवनामदेव दामाशेटी शिंपी
नारायणसुतश्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजनवसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंधरा.श्री. जोग
निळोबानिळा मुकुंद पिंपळनेरकर
नीरजानीरजा साठे
नृसिंहसरस्वतीनरहरी माधव काळे
पठ्ठे बापूरावश्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पद्मविहारीरघुनाथ गणेश जोशी
पद्मापद्मा गोळे
पी.सावळारामनिवृत्तिनाथ रावजी पाटील
पुरु.शिव. रेगेपु.शि. रेगे
पूर्णदासबाबा उपसकर-राजाध्यक्ष
प्रभाकरशाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथभगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाईबहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाईकु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुतज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
बाबा आमटेमुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथविनायक श्यामराव काळे
बालकवी/कलापित्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळाबाळा कारंजकर
बी ; Bबाळकृष्ण अनंत भिडे
बी; BEEनारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारीभगवान रघुनाथ कुळकर्णी
बोधलेबुवामाणकोजी भानजी जगताप
भगवानकविभवान रत्नाकर कऱ्हाडकर
भानजीभास्कर त्रिंबक देशपांडे
भानुदास/मामळूभटभानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्मपांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भावशर्माके.(केशव) नारायण काळे
भालेंदुभालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर
भ्रमर/किरातकृष्णाजी लक्ष्मण सोमण
मंदारएकनाथ पांडुरंग रेंदाळकर
मध्वमुनीश्वरत्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मनमोहनगोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
मनोहरबंधूभास्कर कृष्ण उजगरे
महिपतीमहिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
महीपतिनाथ/ढोलीबुवासखाराम केरसुणे
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबामाणिक मनोहर नाईक, हरकुडे
माधवमाधव केशव काटदरे
माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
माधव मिलिंदकॅ. मा.कृ. शिंदे
माधवसुतदामोदर माधव कुळकर्णी
माधवानुजकाशीनाथ हरी मोडक
मार्क ट्वेनसॅम्युएल लॅंगहाॅर्न क्लेमन्स
मीरामीरा तारळेकर
मीराबाई[[]]
मुकुंदराज?
मुकुंदरायमुकुंद गणेश मिरजकर
मुक्ताबाई/मुक्ताईमुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तिबोधशरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वरमुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंतमोरेश्वर रामचंद्र पराडकर
यशवंतयशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरायशोधरा साठे
योगेशभालजी पेंढारकर
रंगनाथस्वामी(निगडीकर)रंगनाथ बोपाजी घोडके
रघुनाथ पंडितरघुनाथपंडित चंदावरकर/तंजावरकर; रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे
रमेशबाळबाळ सीताराम मर्ढेकर
राजहंसयादव शंकर वावीकर
रा. देव[[]]
राधारमणकृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविरायराम जनार्दन जोशी
रामदासनारायण सूर्याजी ठोसर
रा. म. शास्त्री, ग्यानबावि.ग. कानिटकर
वसंतवासुदेव बळवंत पटवर्धन
डॉ. वसंत अवसरेशांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)
वसंतविहारशंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ.वामन दाजी ओक
वामन पंडितवामन तानाजी शेषे / वा शेष
विठाबाईविठा रामप्पा नायक
विठा रेणुकानंदनविठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
विठ्ठल केरीकरविठ्ठल नरसिंह साखळकर
विठ्ठलदासविठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विंदा करंदीकरगोविंद विनायक करंदीकर
विनायक/एक मित्रविनायक जनार्दन करंदीकर
विष्णूदासकृष्णराव रावजी धांदरफळे
विसोबा खेचरविसोबा चाटे
विहंगमबाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाखत्र्यं.वि. देशमुख
शारदाश्रमवासीपुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शुभानंत[[]]
श्रीकांत[[]]
श्रीकृष्णश्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधरश्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीरामश्रीनिवास रामचंद्र बोबडे
संजीवकृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनीसंजीवनी मराठे
सदानंदस्वामीसदानंद चिंतामणी उपासनी
सरस्वतीकंठाभरणदिनकर नानाजी शिंदे
साधुदासगोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सानियासुनंदा बलराम कुलकर्णी
साने गुरुजीपांडुरंग सदाशिव साने
सामराजशामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
सांवतामाळीसांवता परसूबा माळी
सुधांशुहणमंत नरहर जोशी
सुमंतअप्पाराव धुंडिराज मुरतुले
सुहृद्चंपापुरुषोत्तम शिवराम रेगे
सौमित्रकिशोर कदम
स्वरूपानंदरामचंद्र विष्णू गोडबोले
हरिबुवाहरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
हरिहरमहाराज/उदासीनीलकंठ रामकृष्ण पाळंदे
प्रीतस्वप्नील चाफेकर
मानसी सरोजनम्रता माळी पाटील
होनाजीहोनाजी सयाजी शेलारखाने
ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत[[ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी]

हे सुद्धा पहा

[संपादन]