चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
Jump to navigation
Jump to search
चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; - बडोदा-[[गुजराथ], १७ मार्च १९३७]) हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले.
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अर्वाचीन अवतार, असे त्यांना म्हटले जाई.
साहित्य[संपादन]
- अर्वाचीन कविता
- उघडं गुपित (कथाकाव्य)
- कविता रति
- किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
- गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
- चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
- चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
- चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
- धनगर (दीर्घकाव्य)
- रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
- स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)