Jump to content

होनाजी बाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(होनाजी सयाजी शेलारखाने या पानावरून पुनर्निर्देशित)
होनाजी बाळा
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे होनाजी-बाळा
नागरिकत्व भारतीय
पेशा
  • शाहीर
  • कवी
  • गीतकार
  • गायक
प्रसिद्ध कामे घनश्याम सुंदरा (भूपाळी)
धर्म हिंदू


होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखानेबाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.

होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.

होनाजी बाळा यांनी लिहिलेली गीते

[संपादन]
  • गोल तुझ्या शरीराचा (लावणी)
  • छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी (लावणी)
  • घडीघडी अरे मनमोहना
  • घनश्याम सुंदरा श्रीधरा (भूपाळी)
  • तुझ्या प्रीतीचे दुःख मला (गीत)
  • तू पाक सूरत कामिना (लावणी)
  • नको दूर देशी जाऊ (विरहगीत)
  • लटपट लटपट तुझं चालणं (लावणी)
  • वक्रतुंड गजानन पावला (नांदी)
  • सांगा मुकुंद कुणि हा पाहिला (गीत)
  • श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड (नाट्यगीत)

पुस्तक, चित्रपट, आणि नाटक

[संपादन]
  • होनाजी बाळा यांच्या जीवनावर व्ही. शांताराम यांनी ’अमर भूपाळी’ नावाचा मराठी चित्रपट काढला.
  • लेखक चिं.य. मराठे यांचे ’होनाजी बाळा’ हे नाटक याच विषयावरचे आहे.
  • होनाजी बाळाकृत लावण्या (चित्रशाळा प्रकाशन-पुणे)