नीरजा (कवयित्री)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नीरजा | |
---|---|
![]() | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
नीरजा (जन्म- २३ ऑक्टोबर १९६०) या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका व कांदबरीकार आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत.त्यांच्या आईचे नाव विभावरी पाटील आहे.
त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. केले आहे. गेली पस्तीस वर्षं विविध कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केल्यावर आता निवृत्त झालेल्या आहेत.
त्या 'ग्रंथालीच्या विश्वस्त होत्या'
'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत.
नीरजा यांनी ६०व्या मराठी साहित्य संमेलनात ‘व्यथा’ ही कविता वाचली होती. १९९१ मध्ये मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात सकाळी नवोदितांच्या कविसंमेलनात ‘सावित्री’ ही कविता म्हटली. ती गाजली. परीक्षक समितीत नारायण सुर्वे आणि प्र. श्री. नेरूरकर होते. त्यांनी संध्याकाळच्या निमंत्रितांच्या संमेलनात कविता वाचण्यासाठी पाच जणांची निवड केली. त्यात त्या होत्या. संध्याकाळी ‘आईस पत्र’ ह्या कवितेच्या मालिकेतील तीन कविता त्यांनी वाचल्या. त्या खूप गाजल्या. नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह निरन्वय १९८७ ला आला व तेव्हापासून त्यांची एकूण १८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
नीरजा यांची साहित्य संपदा
[संपादन]कादंबरी
[संपादन]थिजलेल्या काळाचे अवशेष (राजहंस प्रकाशन) (ऑगस्ट २०२२)
काव्यसंग्रह
[संपादन]एकूण सहा
१. निरन्वय(१९८७),
२. वेणा(१९९४)
३. स्त्रीगणेशा (२००३)
४. निरर्थकाचे पक्षी(२०१०)
५. मी माझ्या थारोळ्यात(२०१५)
६. विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी( मार्च २०२२)
कथासंग्रह
[संपादन]एकूण ४
१. जे दर्पणी बिंबले(२००१)
२. ओल हरवलेली माती(२००६)
३. पावसात सूर्य शोधणारी माणसं(२०१२)
४. अस्वस्थ मी अशांत मी (२०१८)
ललित लेखसंग्रह
[संपादन]एकूण ४
१. बदलत्या चौकटी (२००७)
२. चिंतनशलाका (२०१०)
३. शब्दारण्य(२०१५)
४. तळ ढवळताना(२०२४)
संपादन
[संपादन]एकूण ३
१. निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर (निवडक रजनी परुळेकर)(२०११)
२. मुंबईच्या कविता (२०११)
३. ऊनउतरणीवरून (निवडक अरुणा ढेरे)(२०२१)
लेख व मुलाखती
[संपादन]लेख
[संपादन]विविध दैनिके, नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित होत असतात.
१० जुलै २०२१ च्या लोकसत्तामध्ये ‘गद्धेपंचविशी :स्वभान देणारे अस्वस्थ दिवस!’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. [२]
१५ सप्टेंबर २०१८ च्या लोकसत्तामध्ये ‘लावायचा आहे छोटासा दिवा’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.
२२ जून २०१३ च्या लोकसत्तामध्ये ‘जगण्याची कविता होते’ तेव्हा हा लेख प्रसिद्ध झाला होता.[३]
https://www.loksatta.com/chaturang/poem-and-story-writer-neerja-136199/
दिव्यमराठी दैनिकात साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी नीरजा यांच्याबरोबर संवाद साधला होता.
‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कादंबरीवरील सुप्रसिद्ध समीक्षक रणधीर शिंदे यांची समीक्षा दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. [५]
सदानीरा या कविता हिंदी पत्रिकेत त्यांच्या काही कवितांचा सुनीता डागा यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाली आहे. [६]
मुलाखती
[संपादन]वाहिन्यांवरील मुलाखती:
दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या मुलाखती होत असतात:
३ फ्रेबुवारी २०२० माझा साहित्य प्रवास अशी मुलाखत: [७]
१६ नोव्हेंबर २०२५ला अमृतवेल या विशेष कार्यक्रमात सर्जनशील लेखनाचा प्रवास यावर मुलाखत: [८]
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त २७ फ्रेबुवारी २०२५ला लाभले आम्हांस भाग्य बोलतो या कार्यक्रमात नीरजा यांच्याबरोबर संवाद झाला होता. यातच त्यांची ओळख करून देताना त्यांच्या पुस्तकांचा आणि पुरस्कारांचा उल्लेख आहे. [९]
प्राप्त पुरस्कार
[संपादन]नीरजा यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
'निरर्थकाचे पक्षी' या काव्यसंग्रहासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचा 'केशवराव कोठावळे' पुरस्कार.
महाराष्ट्र फाऊंडेशनचा २०१३चा ललित ग्रंथ पुरस्कार,
याशिवाय इतर पुरस्कार असे आहेत:
नीरजा यांना आजवर महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पुरस्कार, इंदीरा संत पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार, ताराबाई शिंदे पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार,
कथाकार जी. ए. पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कोकण साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, लोकमत पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर वाग्विलासिनी पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचा अ.वा. वर्टी पुरस्कार, गोमंत विद्यानिकेतन यांचा कविवर्य दामोदर अच्च्युत कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार, शिरीष पै पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार इत्यादी २८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तसेच या कादंबरीस सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा धनंजय कुलकर्णी पुरस्कार तसेच जळगाव येथील स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत.
इतर सन्मान
[संपादन]आजवर त्यांनी पहिले शिक्षक साहित्य संमेलन, मुंबई, चौथे सम्यक साहित्य संमेलन, पुणे, नववे लेखिका संमेलन, फोंडा गोवा, विदर्भ साहित्य संघातर्फे घेतलेले राज्यस्तरिय लेखिका संमेलन, नागपूर(२०१३), ४४ वे महानगरीय साहित्य संमेलन कल्याण. (२०१९), कविता महोत्सव, सह्याद्री साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद, राज्यस्तरिय महिला साहित्य संमेलन, बुलढाणा (२०१९), निमंत्रितांचे कविसंमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, सासवड (२०१४), निमंत्रितांचे कवीसंमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, उस्मानाबाद(२०२०), साहित्य सखीचे सहावे महिला साहित्य संमेलन, नाशिक(२०२४) अशा विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.
श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था व कला, संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडा येथे नववे गोमंतक महिला साहित्य संमेलन संपन्न झाले होते.
त्यातील संमेलनाध्यक्षा नीरजा यांचे अध्यक्षीय भाषण भाषण इथे उपलब्ध आहे,
विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमात पुस्तकांचा समावेश आहे.
संदर्भ व टीप
[संपादन]- ^ राजहंस प्रकाशन, कादंबरीची माहिती (2022). "थिजलेल्या काळाचे अवशेष". राजहंसप्रकाशन. पुणे: राजहंस प्रकाशन (प्रकाशित ऑगस्ट २०२२). ISBN 978-93-95483-13-1.
- ^ https://www.loksatta.com/chaturang-news/social-awareness-adarsh-soon-uneasy-days-of-self-consciousness-feminist-akp-94-2524208/
- ^ कवयित्री, नीरजा (२०१३). "जगण्याची कविता होते तेव्हा". पुणे: सकाळ.
- ^ दिव्यमराठी, दैनिक (२०१६). "संजय भास्कर जोशी यांनी नीरजांबरोबर साधलेला संवाद". दिव्यमराठी दैनिक.
- ^ https://www.esakal.com/saptarang/randhir-shinde-writes-thijlelya-kalache-avshesh-book-pjp78
- ^ https://sadaneera.com/poems-of-marathi-poet-neeraja-translated-in-hindi-by-sunita-daga/
- ^ https://www.youtube.com/watch?v=FXn0JdAIoHY
- ^ https://www.youtube.com/watch?v=KjV7t22wvUM
- ^ https://www.youtube.com/watch?v=3_Ox7F_zu1o