Jump to content

दामोदर विष्णू नेने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादूमिया या पानावरून पुनर्निर्देशित)

दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (इ.स. १९२९ - ) हे वडोदरा शहरात राहणारे एक प्रसूतितज्ज्ञ डाॅक्टर, विचारवंत आणि लेखक आहेत. मुस्लिमबहुल भागात प्रॅक्टिस असल्याने त्यांचे अनेक रुग्ण मुस्लिम असत. त्यांचा कुराणचा अभ्यास असल्याने ते त्या विषयी लिहीत. पण नेने या नावाने लिहिले तर कोण वाचणार म्हणून त्यांनी लिखाणासाठी आपल्या पेशंटचे दादूमिया हे नाव घेतले.

दादूमियांचा जन्म पुण्याचा. त्यांचे पहिलीचे शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये झाले. त्यांचे वडील आणि आजोबा यांनी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. दादूमियांचे अनेक मोठ्या लोकांशी मैत्री होती आणि आहे. पं. नेहरूंची मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.

इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असत.

तरुण वयापासूनच मराठी, इंग्लिश, गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.

भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर पं. नेहरूंना सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ते इंदिरा आंटी म्हणून संबोधायचे. इ.स. १९६६साली दादूमियांनी इंदिरा गांधी यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.

दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका (इंग्रजी-१६खंडी ज्ञानकोश, प्रकाशनपूर्व अवस्थेत)
  • गुजराथला जेव्हा जाग येते
  • दलितस्थान झालेच पाहिजे
  • दलितांचे राजकारण
  • द्रौपदीची मुलगी
  • धास्तावलेले नुसलमान
  • श्रीमंत सयाजीराव गायकवाड

हे सुद्धा पहा

[संपादन]