यादव शंकर वावीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यादव शंकर वावीकर ऊर्फ राजहंस (इ.स. १८७३ - इ.स. १९५२) हे एक मराठी निबंधकार होते.

मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर वावीकर कस्टम खात्यात लागले.

पुस्तके[संपादन]

  • तुकाराम, रामदास यांच्या काव्यांतील बोधपर वेचे (संपादित)
  • दोनशे वर्षापूर्वी पृथ्वी-प्रदक्षिणा करणाऱ्या एका प्रवाशाचे हिंदुस्थानातील प्रवासवृत्त (मूळ इटालियन लेखक डॉ. जॉन फ्रान्सिस गॅमिली). या प्रवासवर्णनात हिंदुस्तानबद्दल विश्वसनीय माहिती होती. पूर्वप्रसिद्धी - ग्रंथमाला मासिक.
  • धम्मपद(१९०१, भाषांतरित ग्रंथ)
  • नूरजहान अथवा जगद्दीप्‍ती १९०५), - राणी नूरजहानच्या आयुष्याची करुण कहाणी
  • मराठी वाङ्मयाची दैन्यावस्था (निबंध, १९०७)
  • वाचन (१९००, या पुस्तकाला डेक्कन व्हरनॅक्युलर सोसायटी व बडोदे सरकार यांची पारितोषिके मिळाली)
  • मेंढ्या, लोकर, लोकरीची वस्त्रे, चाऱ्याकरता गुरांचा हंबरडा, हिरवळ कुंपण आणि त्याचे फायदे, वृक्षसंवर्धन-झाडांची शेती व उद्योगधंदे, गायी पाळणे कसे फायदेशीर ठरते, ही शेती आणि बागायती या विषयावरील विविध पुस्तके
  • ग्रामोद्योग कोश (जनतेला मार्गदर्शनपर करणाऱ्या पुस्तिका)