तुकारामतात्या पडवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुकारामतात्या पडवळ
विकिस्रोत लोगो तुकारामतात्या पडवळ यांचे, अथवा यांच्या बद्दलचे साहित्य मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
टोपणनाव एक हिंदू [१]
जन्म इ.स. १८३१
वडावरे (रत्‍नागिरी जिल्हा)
मृत्यू ३ जून, १८९८
मुंबई (?)
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र संतसाहि्त्याचे संकलन व प्रकाशन, सत्यशोधक चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती जातिभेदविवेकसार
Disambig-dark.svg

तुकाराम तात्या पडवळ (जन्म : वडावरे, रत्‍नागिरी जिल्हा-महाराष्ट्र; मृत्यू : ३ जून, इ.स. १८९८) हे एक मराठी साहित्यिक आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. [२][३]

तुकारामतात्यांचे शिक्षण मुंबईत रॉबर्ट मनी हायस्कूलमधून झाले. पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय असावेत. १८८० साली ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले. तुकारामतात्यांचा थिऑसॉफीबरोबर हिंधुधर्मशास्त्राही सूक्ष्म अभ्यास होता. याच धर्मचिंतनाचा उपयोग करून त्यांनी ' एक हिंदू ' या टोपण नावाने ' जातिभेदविवेकसार ' नावाचा ग्रंथ १८६१ साली प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती महात्मा जोतीराव फुले यानी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. [४][५] तिसरी आवृत्ती १८८४ साली निघाली. वेदोत्तर काळात ब्राह्मणांनी केवळ स्वार्थासाठी वर्णांवरून जाती निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला असावा, याला शास्त्रांत आधार सापडतात, असा निष्कर्य ह्या ग्रंथात काढण्यात आलेला आहे.

छापखाना आणि प्रकाशन[संपादन]

तुकारामतात्या पडवळ यांनी ’तत्त्वविवेचक’ यानावाचा छापखाना काढून संस्कृत धर्मग्रंथ, वारकरी संतांच्या अभंगगाथा, व काही इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या (१९५०) अधिकृत गाथेत (संपादकः पु.मं. लाड) ४६०० अभंग आहेत. तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत.

तुकारामतात्या पडवळ यांनी आठ हजारांपेक्षा अधिक अभंग मिळवून प्रसिद्ध केले. गाथा प्रकाशनासंबंधीची ही माहिती केळुस्करांनी त्यांच्या तुकाराम चरित्रात आवर्जून दिली आहे.

तुकारामतात्या पडवळ यांनी लिहिलेले वा प्रकाशित केलेले ग्रंथ[संपादन]

  • जातिभेदविवेकसार (लेखन व प्रकाशन, १८६१)
  • समग्र तुकाराम गाथा (वरदा प्रकाशन)
  • तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. भाग १ व २ (संकलन व प्रकाशन, १८८१)
  • श्रीएकनाथ महाराजांच्या अभंगांची गाथा (संपादन, १९०३)

टीप[संपादन]

ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर तुकारामतात्यांचा जन्म ३ जून १८९८ रोजी दिलेला आहे, ते अर्थातच चुकीचे आहे. तो दिवस त्यांचा पुण्यस्मरणदिन आहे.

संदर्भ[संपादन]