आनंद साधले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दमयंती सरपटवार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

आनंद साधले (मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले]] हे मराठीतले एक विद्वान लेखक होते. 'हा जय नावाचा इतिहास' ह्या युधिष्ठिराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीला कुप्रसिद्धी, पण नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले. शेवटी 'दीपावली'ने त्यांच्या मासिक अंकांत ती प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचकांनी तिला डोक्यावर घेतली. कादंबरी जसजशी पुढॆ सरकत गेली तसतसे तिचे विरोधक हळूहळू थंडावले.

दमयंती सरपटवार या अधिकच्या टोपणनावाने आनंद साधले यांनी काहीसे चावट वाटणारे लेखनही केले आहे.

आनंद साधले ह्यांचे वास्तव्य तेलंगणातील हैदराबाद येथे होते. नंदिनी साधले हे त्यांच्या पत्नीचे नाव.

आनंद साधले यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]


साधले यांच्यावरील पुस्तके[संपादन]

  • आनंद साधले : साहित्यसूची (आनंद साधले यांच्या साहित्याची सूची, सूचिकार- उमा दादेगावकर )