टोपणनावानुसार मराठी लेखक
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती?
मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता. आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, ओवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी
अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफत असत त्यालाच उर्दूमध्ये मक्ता असे म्हणतात.
' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥ ' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥' ' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥' ' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्धाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥' 'आठवुणी हैदर गुरुजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥' संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते. मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला आस्तेआस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरुवात झाली. आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरुवात झाली. या नावालाच टोपणनाव असे म्हणतात. हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.
- अगदी सुरुवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे. उदा. तुका, जनी, नामा, ज्ञानदेव
- पुढच्या काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
- स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरुण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वतःला सुरक्षित ठेवून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
- आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला. उदा. आठवुणी हैदर गुरुजींला, एका जनार्दनी, बाप रखुमाईवरा
- काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते. उदा. अनुतनय, चंद्रकुमार, कुसुमाग्रज, केशवसुत, गोविंदाग्रज, रत्नाकर
- काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी त्या व्यक्ती मूळ नावाशी दुरान्वयेही संबंध नसणारे टोपणनाव घेतात.
- तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःचे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन ते त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावतात.
- कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
- काही संपादक संकुचित वृत्तीने ठराविक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी, त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
- विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
- ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
- काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
- स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरुषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रुजविले आहे.