पतंगराव कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पतंगराव कदम (इ.स. १९४५:सोनसळ, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - हे मराठी राजकारणी आहेत. ते महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री होते.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म झाला.

कार्य[संपादन]

डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये 180 शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.[१]

  • डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत.
  • नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि Computer Application यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत.

पुरस्कार[संपादन]

त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. [१]