इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय प्रीमियर लीग
Ipl.svg
लोगो भारतीय प्रीमियर लीग
देश भारत भारत
आयोजक बीसीसीआय
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००८
शेवटची २०१४
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेता कोलकाता नाईट रायडर्स (२ वेळा)
यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स (२ वेळा)
कोलकाता नाईट रायडर्स (२ वेळा)
पात्रता २०-२० चँपियन्स लीग
सर्वाधिक धावा सुरेश रैना (३३२५) चेन्नई
सर्वाधिक बळी लसिथ मलिंगा (११९) मुंबई
संकेतस्थळ www.iplt20.com
Cricket current event.svg २०१६ इंडियन प्रीमियर लीग

माहिती[संपादन]

इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेअरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.

सामने[संपादन]

दूरचित्रवाणी करार[संपादन]

दूरचित्रवाहिनी प्रादेशिक विभाग माहिती
सोनी वाहिनी/वर्ल्ड स्पोर्ट्‌स ग्रुप
विश्व हक्क, भारत १० वर्ष, USD 1.026 Billion
नेटवर्क टेन ऑस्ट्रेलिया ५ वर्ष, १०-१५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर .[१]
सेटंटा स्पोर्ट्‌स
इंग्लंड आणि आयर्लंड ५ वर्ष [२]
अरब डिजिटल डिस्ट्रीब्युशन मध्य-पूर्वेतील देशांमध्ये प्रसारणाचे हक्क अरब डिजिटल डिस्ट्रीब्युशनच्या एआरटी प्राइम स्पोर्ट वाहिनी कडे आहेत. ही वाहिनी पुढील देशांमध्ये प्रसारण करेल: संयुक्त अरब अमिराती, बहारीन, इराण, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबेनॉन, ओमान, कतार, पॅलेस्टाइन, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्कस्तान, अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनिशिया, इजिप्त, सुदान आणि लीबिया. १० वर्ष.[३]
विलो टीवी उत्तर अमेरिकेत दूरदर्शन, रेडियो, ब्रॉड-बॅन्ड तसेच इंटरनेट प्रसारणाचे हक्क. ५ वर्ष[४]
सुपरस्पोर्ट्‌स
दक्षिण आफ्रिका
जीइओ सुपर
पाकिस्तान
एटीएन/सीबीएन
कॅनडा

स्पर्धा प्रायोजक करार[संपादन]

संघ[संपादन]

फ्रँचाईजी मालक किंमत (USD)
मुंबई इंडियंन्स
मुकेश अंबानी and रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड $111.9 million
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स डॉ. विजय मल्ल्या and यू.बी. समूह $111.6 million
डेक्कन चार्जर्स
डेक्कन क्रॉनिकल $107 million
चेन्नई सुपर किंग्ज इंडिया सिमेंट आणि एन. श्रीनिवासन $91 million
दिल्ली डेअरडेव्हिल्स जी.एम.आर. होल्डिंग्स $84 million
किंग्स XI पंजाब
प्रीती झिंटा, नेस वाडिया, करन पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) आणि मोहित बर्मन (डाबर) $76 million
कोलकाता नाईट रायडर्स
शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता $75.09 million
राजस्थान रॉयल्स इमर्जिंग मीडिया: (मनोज बडाळे, लाचलन म्युड्रॉक आणि सुरेश चेलाराम) $67 million

खेळाडू करार[संपादन]

फेब्रुवारी २० २००८ रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले.

नियम[संपादन]

एखादा संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत.[५][६]

१. वार्षिक खेळाडू लिलावातून

२. इतर संघातील भारतीय खेळाडूंना 'विकत' घेऊन.

३. कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन.

४. इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून.

५. असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन.

प्रत्येक खेळाडूचा व्यवहार त्याच्या संमतीने हा ठरवलेल्या व्यापारी चौकटीत केला जाऊ शकतो. संघमालकला जुन्या व नवीन करारातील फरक द्यावा लागेल. जर नवीन करार हा पूर्वीच्या करारापेक्षा कमी किमतीचा असेल तर पूर्वीच्या संघमालक व खेळाडू हे फरक सोसतात.[७]

संघाच्या बांधणीसाठीचे काही नियम असे आहेत:[संपादन]

 • संघात किमान १६ खेळाडू आणि एक संघ फिजियो व एक संघ प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
 • संघात ८ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू व खेळताना ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवले जाऊ नयेत.

२००९ पासून परदेशी खेळाडूंची संख्यामर्यादा १० करण्यात आली आहे.

 • प्रत्येक संघात किमान ८ स्थानिक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
 • प्रत्येक संघामध्ये खालील २२ भारतीय संघांतील किमान २ खेळाडू असावेत.

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले. खेळाडूंच्या लिलावाकरिता संघाला५ दशलक्ष डॉलरचे बंधन घालण्यात आले. २२ वर्षाखालील किमान वार्षिक मानधन $२०००० निश्चित करण्यात आले, तर बाकीच्यांना $५०००० निश्चित करण्यात आले. आयकॉन खेळाडूंना त्या-त्या संघात सर्वांत महाग बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा १५% अधिक रक्कम द्यावी लागेल.

स्पर्धेचे नियम असे आहेत. here.

संघांची कमाई[संपादन]

इंडियन प्रीमियर लीगचे पहिले पर्व १ जून २००८ ला संपले, पहिल्या पर्वात भरमसाठ भांडवली गुंतवणूक असल्याने, संघ फायद्यात असतील असे कोणालाही वाटले नव्हते. खालील सारणीत दाखवल्याप्रमाणे फायदा-तोटा आहे.[८]

संघ मिळकत खर्च नफा/तोटा (Rs. करोड)
मुंबई इंडियन्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 20
क. तिकीट विक्री - 14
एकूण मिळकत(अ+ब+क) - 69

अ.संघ फीज - 45
ब.संघ खर्च- 20
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 85
तोटा - 16(To be profitable in season 2)
[[]]
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 0
क. तिकीट विक्री - 10
एकूण मिळकत(अ+ब+क) - 45

अ.संघ फीज - 48
ब.संघ खर्च - 22
क.प्रचार आणि संचालन - 18
एकूण खर्च(अ+ब+क) - 88
तोटा - 43
डेक्कन चार्जर्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 17 ;
क. तिकीट विक्री - 12
एकूण मिळकत(अ+ब+क) - 64

अ.संघ फीज - 45
ब.संघ खर्च - 24
क.प्रचार आणि संचालन- 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 82
तोटा - 18
चेन्नई सुपर किंग्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 25
क. तिकीट विक्री - 12.8
एकूण मिळकत(अ+ब+क) - 72.8

अ.संघ फीज - 36
ब.संघ खर्च - 24
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 73
तोटा - 0.2(To be profitable in season 2)
दिल्ली डेरडेव्हिल्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 20
क. तिकीट विक्री - 15.4
एकूण मिळकत(अ+ब+क) - 70.4

अ.संघ फीज - 34
ब.संघ खर्च - 23
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 77
तोटा - 6.6(To be profitable in season 2)
किंग्स XI पंजाब

अ. प्रक्षेपण अधिकार- 35
ब. संघ प्रायोजक - 22
क. तिकीट विक्री - 9
एकूण मिळकत(अ+ब+क) - 66

अ.संघ फीज - 30.4
ब.संघ खर्च - 25
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 68.4
तोटा - 2.4(To be profitable in season 2)
कोलकाता नाईट रायडर्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 34
क. तिकीट विक्री - 20
एकूण मिळकत(अ+ब+क) - 89

अ.संघ फीज - 31
ब.संघ खर्च - 25
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 76
नफा - 13
राजस्थान रॉयल्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 16
क. तिकीट विक्री - 8
एकूण मिळकत(अ+ब+क) - 59

अ.संघ फीज - 27
ब.संघ खर्च - 13
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 53
नफा - 6
 • सर्व आकडे कोटीमध्ये आहेत. (1 कोटी = 10,000,000)

Source: Refer 16 in reference section

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. "क्रिक‍इन्फो - ऑस्ट्रेलिया - टु गेट लाइव्ह कव्हरेज ऑफ आयपीएल". 2008-04-12 रोजी तपासले. 2008-04-12 रोजी पाहिले. 
 2. जॉन प्लंकेट. "सेटंटा स्नॅफल्स आयपीएल क्रिकेट यूके राइट्स", द गार्डियन. 2008-03-21 रोजी तपासले. 2008-03-21 रोजी पाहिले. 
 3. अरब डिजिटल डिस्ट्रिब्यूशन
 4. विलो टीव्ही
 5. Slow trading with all eyes on auction, Brief discussion of IPL rules on acquiring players.
 6. IPL lays down guidelines for replacements, Discusses IPL rules on buying replacement players players.
 7. http://content-usa.cricinfo.com/india/content/story/374805.html, IPL rules when trading players.
 8. Will cricket's new czars make money?, 14 May 2008


बाह्य दुवे[संपादन]