शाहरुख खान
शाहरुख खान | |
---|---|
![]() | |
जन्म |
२ नोव्हेंबर, १९६५ नवी दिल्ली |
इतर नावे | किंग खान, बादशाह ऑफ बॉलिवूड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८८ - |
भाषा | हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा |
पत्नी | |
अपत्ये | अबराम, सुहाना, आर्यन |
स्वाक्षरी [[File:ShahRukh Khan Sgnature transparent.png|128px|alt=]] | |
![]() | iamsrk |

शाहरुख खान (Shah Rukh Khan; २ नोव्हेंबर, इ.स. १९६५, लोकप्रिय संक्षिप्त नाव: एस.आर.के.) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो [ संदर्भ हवा ]. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो [ संदर्भ हवा ].
१९८० च्या दशकामध्ये फौजी, सर्कस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये शाहरूखने भूमिका केल्या. २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून त्याने १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची जोडी लोकप्रिय आहे [ संदर्भ हवा ].
शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे. २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. २००७ साली कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा तो सादरकर्ता होता. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले, तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. खूप गरीब परिस्थितीमधून यश मिळवलेला हा लोकांचा खूप प्रिय कलाकार आहे . त्याचे चाहते फक्त भारतात नसून अख्या जगभर आहेत.
चित्रपटयादी[संपादन]
इ. स. 2018
झिरो
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शाहरुख खान चे पान (इंग्लिश मजकूर)