सनरायझर्स हैदराबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सनरायझर्स हैदराबाद
पूर्ण नाव सनरायझर्स हैदराबाद
स्थापना २०१२
मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक कलानिधी मारन, सन नेटवर्क
प्रशिक्षक टॉम मूडी
कर्णधार डेव्हिड वॉर्नर
लीग भारतीय प्रीमियर लीग
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल ५ २०१३
हैदराबाद वि पुणे
Soccerball current event.svg सद्य हंगाम

सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधीत्व करतो [१]. सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत[२]. कुमार संघकारा हा हैदराबाद संघाचा कर्णधार आहे, परंतू सध्या त्याच्या खराब कामगिरी मुळे कॅमेरोन व्हाइटकडे कर्णधारपदाची धुरा आहे. टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[३][४]

संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतू बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला[५].या संघाने २०१८ च्या आय .पी एल .साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे .२०१६ या वर्षी या संघाने आय .पी .एल. चे विजेते पद पटकावले होते .

संदर्भ आणि नोंदी[संपादन]