रायझिंग पुणे सुपरजायंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायझिंग पुणे सुपरजायंट
पूर्ण नाव रायझिंग पुणे सुपरजायंट
स्थापना इ.स. २०१५ (2015)
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
मालक संजीव गोयंका
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
कर्णधार स्टीव्ह स्मिथ[१]
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
सद्य हंगाम

रायझिंग पुणे सुपरजायंट (Rising Pune Supergiant) हा पुणे शहरामधील एक व्यावसायिक क्रिकेट संंघ आहे. २०१५ साली स्थापन झालेला हा संंघ भारताच्या इंडियन प्रीमियर लीग ह्या ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळतो. अवैध सट्टाबाजीमध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरून बी.सी.सी.आय.ने चेन्नई सुपरकिंग्सराजस्थान रॉयल्स ह्या दोन संघांना २ वर्षांसाठी आय.पी.एल.मधून निलंबित केले व त्यांच्या जागेवर गुजरात लायन्स व रायझिंग पुणे सुपरजायंट ह्या दोन नव्या क्लबांची स्थापना करण्यात आली.

पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे रायझिंग पुणे सुपरजायंटचे गृह-मैदान आहे. परंतु २०१६ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ इंडियन प्रीमियर लीगचे महाराष्ट्रातील सर्व सामने राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय दिला. ह्या कारणास्तव रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे सर्व यजमान सामने विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान येथे हलवण्यात आले. रायझिंग पुणे सुपर जायंट या संघाने २०१७ मधील आय .पी .एल .चे उपविजेते पद पटकावले होते .

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आरपीएसच्या कर्णधारपदी आता धोनीऐवजी स्मिथ". www.esakal.com. १९ फेब्रुवारी २०१७. Archived from the original on 2017-04-26. २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]